उल्हासनगर : महापालिकेने सील केलेल्या धोकादायक इमारती चोरांच्या टार्गेटवर आल्या असून सी ब्लॉक येथील धोकादायक शिवजगदंबा अपार्टमेंट मध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अज्ञात चोरा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून महापालिकेने धोकादायक इमारती सुरक्षाचा उपाय म्हणून सील केल्या आहेत. तसेच काही अतीधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. ज्या धोकादायक इमारती शील केल्या आहेत. त्या बंद इमारती चोरांच्या टार्गेटवर आल्या असून अश्या इमारती मध्ये घुसून लोखंडी ग्रील, पाण्याची मशीन, एसी, पंखे, घरातील इतर साहित्य चोरण्याचे प्रकार घडत आहे. सीब्लॉक परिसरात शिवजगदंबा इमातीच्या चौथा मजल्यावर विशालकुमार गुप्ता यांचा प्लॅट आहे. महापालिकेने इमारत धोकादायक जाहीर केल्यावर, नागरिक डिसेंबर २०२२ पासून दुसरीकडे राहण्यास गेले. त्या दरम्यान बंद घरातील एसी, पंखे, पाणी भरण्याची मशीन, इलेक्ट्रिकल केबल असा एकून ३८ हजाराचे साहित्य चोरीला गेल्याचे उघड झाले.
विशालकुमार गुप्ता यांनी धोकादायक इमारतीच्या बंद प्लॅट मधून साहित्याची चोरी झाल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर, पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला. शहरातील धोकादायक इमारतीच्या बंद प्लॅट व इमारती मधून सर्रासपणे चोरी होत आहे. भंगार चोरांनी अश्या इमारती टार्गेट केल्या असून यातून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली. पोलीस व महापालिका यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.