लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे उभ्या असलेल्या दोन मोटारकारच्या काचा फोडून चोरटयांनी नामांकित कंपनीचा मोबाईल, टॅबलेट आणि काही रोकड अशा ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे प्रसाद विरकुड (४२) यांनी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.१० ते ६.४५ वाजण्याच्या दरम्यान घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा दोस्ती इम्पेरिया येथील सेवा रस्त्यावर त्यांची मोटारकार उभी केली होती. त्यादरम्यान त्यांच्या कारच्या डाव्या बाजूची पाठीमागील दरवाजाच्या वरील काच फोडून सात हजारांचा टॅबलेट, एक बॅग, चार हजारांची रोकड आणि दहा हजारांचे गिफ्ट कार्ड असा २१ हजारांचा ऐवज अज्ञात चोरटयाने लंपास केला. त्याचवेळी तत्वज्ञान विज्ञापीठ येथील गेटजवळील सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या सचिन चव्हाण यांच्या मोटारकारच्याही काचा फोडून चोरटयांनी अशीच चोरी केली. चव्हाण यांच्या कारमधील ३५ हजारांचा मोबाईल आणि एक बॅग लंपास केली. या दोन्ही चोऱ्यांची तक्रार विरकुड यांनी चितळसर पोलीस ठाण्यात ६ डिसेंबर रोजी दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. साळवी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात दोन कारच्या काचा फोडून ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:01 PM
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे उभ्या असलेल्या दोन मोटारकारच्या काचा फोडून चोरटयांनी नामांकित कंपनीचा मोबाईल, टॅबलेट आणि काही रोकड अशा ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना नुकतीच घडली. कारमधील चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे कार चालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्दे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा कार चालकांमध्ये चोरटयांची दहशत