ठाणे : नारपोली रोड अपघातात चार तरुण इंजिनिअरवर काळाने झडप घातली. ते सोमवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीसाठी डोंबिवलीत जमले होते. उशीर झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी रेल्वेने घरी जाण्याचे ठरवले होते. पण पार्टीला न आलेल्या आणि कार चालवणाºया विक्रांत सिंगला कोणीतरी बोलावून त्घेतले आणि त्याच्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच एखाद्याच्या घरी झालेली ती पार्टी त्यांची शेवटीची पार्टी ठरली.सिंग हे त्या सहा जणांना जवळच्या स्टेशनजवळ सोडून पुढे पुढे कामावर जाणार होते. मीरा रोडमधील नीरज पांचाळ (३०) याचा सोमवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त पार्टी डोंबिवलीत करण्याचे ठरले होते. त्यानुसार, संंकेत यांच्या मित्राच्या घरी सर्वजण जमले. पार्टी झाल्यानंतर डोंबिवलीत राहणाºयांनी मध्यरात्री घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण नीरज पांचाळ, मिहीर उतेकर, नीरव मेहता आणि जखमी वैभव छेडा, रमेश पटेल, संतोष मिश्रा तेथेच थांबले. पार्र्टीत सहभागी नसलेल्या डोंबिवलीच्या विक्रांतला त्यांनी बोलावून घेतले. नारपोली अपघात झाल्यावर, त्यांच्या कारचा अपघात झाला. ते कळताच सांताक्रुझ येथील स्पेस इंजिनिअर कंपनीतील त्यांच्या सहकाºयांना समजल्यावर त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्या कंपनीत विक्रांत सिनिअर इंजिनिअर होता व त्याच्या हाताखाली इतर काम करीत होते. प्रत्येक जण लोकलने कामावर जात असे.पण मेगाब्लॉक असला तर विक्रांतची गाडी ते वापरत, तसे त्यांनी त्याला सवयीने बोलावले असावे. या घटनेचे वृत्त कळताच त्यांच्या सहकाºयांनी रुग्णालयात धाव घेतली. सहकारी हरपल्याचे दुख: त्यांच्या चेहºयावर दिसत होते.वाढदिवसही अखेरचानीरजचा वाढदिवस असल्याने केलेली पार्टी त्याच्यासह अन्य सहकाºयांसाठी शेवटचीच ठरली. मित्रांना सोडून विक्रांत सिंग आॅफिसला जाणार होते. पण त्याऐवजी आॅफिसात पोचली मृत्युची बातमी आणि सारे सहकारी रूग्णालयात धावले.
त्यांंची ती पार्टी शेवटचीच ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 6:34 AM