ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील पाच लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरु केली होती. परंतु मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत त्याला एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एक आठवड्याची मुदतवाढ महापालिकेने या निविदा प्रक्रियेला दिली आहे.परंतु त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेला देखील प्रतिसाद न आल्यानेच ठाणे महापालिकेने देखील आता त्याची मानसिक तयारी केली असून त्यानुसारच हे टेंडर बासणात गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच लाख लसींसाठी ५० कोंटीचे ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी मंगळवार र्पयत निविदा भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. पालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविले आहे. २६ मे पासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिके प्रमाणो ठाणोकरांना लस मिळावी या उद्देशाने ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणो महापालिकेने देखील ग्लोबल टेंडर काढावे असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणो महापालिकेने हे टेंडर काढले. तसेच, उत्पादन क्षमता आहे, त्यांनाच यात सहभागी होता येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागिदार, पुरवठादार, वितरक यांनाच हे टेंडर भरता येण्यासारखे होते.
लसपुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंपन्या आणि वितरकांनाच देकार भरता येणार आहेत, स्वारस्य देकार सादर झाल्यानंतर पालिकेची निविदा कमिटी तांत्रिक आघाडय़ांवर त्यांची तपासणी करणार, सर्व अटी - शर्तीची पुर्तता करणा:या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडले जाऊन, त्यात कमी बोली लावणा:या, तसेच कमीत कमी वेळेत लसपुरवठय़ाची तयारी दाखविणा:या उत्पादन किंवा वितरकांची निवड केली जाणार आहे. परंतु, आता पालिकेने काढलेल्या या निविदेला एकानेही प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई महापालिकेची देखील अशीच काहीशी गत झालेली आहे. तेथे देखील निविदेस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच आता ठाणो महापालिकेने पुढील सात दिवसांची मुदतवाढ यासाठी दिलेली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे जरी सांगितले जात असले तरी मुंबई महापालिकेला ज्या पध्दतीने प्रतिसाद मिळालेला नाही, त्याच पध्दतीने ठाणे महापालिकेला देखील या ग्लोबल टेंडरसाठी प्रतिसाद मिळणार नसल्याची माहिती पालिकेच्या सुत्रंनी दिली आहे. त्यामुळेच पुढील सात दिवसात प्रतिसाद मिळाला नाही. तर हे ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळण्याची तयारी पालिकेने केली आहे.
ग्लोबल टेंडरला तुर्तास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच आता त्यासाठी पुढील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.(गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)