सुरेश लोखंडे ठाणे जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या खरीप हंगामात ६० हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करून त्यासाठी भाताची रोपे मोठ्याप्रमाणात तयारही केली आहेत. मात्र त्या आता करपू लागल्या आहेत. आगामी दोन दिवसात पाऊस न पडल्यास भात लागवड संकटात सापडण्याची शक्यता खुद्द जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे दोन टक्के म्हणजे केवळ एक हजार २०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आतापर्यंत भाताची लागवड होणे अपेक्षीत होते. पण पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. रोपांची वाढ झाल्यानंतर ठराविक दिवसात त्यांची लागवड होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रोप वाटीका मोठ्याप्रमाणात तयार केल्या आहेत. पण आता त्यांचे नुकसान होऊ घातले आहेत. भात रोपांचे शेंडे सुकू लागले आहेत. त्यांची वेळीच लागवड होणे आवश्यक आहे. अन्यथा भात लागवडीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
... तर भातशेती संकटात
By admin | Published: July 08, 2015 12:11 AM