शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मग भाजपाचा टेकू घेतलाच का?

By admin | Published: October 30, 2015 11:55 PM

डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का?

डोंबिवली : डाळींचे भाव वधारले, राज्यात दुष्काळासह गरीबीमुळे आत्महत्या होत आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. या सा-याला काय केवळ भाजप सरकार जबाबदार आहे का? असे असेल तर केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल डोंबिवलीकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. नेहमीच टिका-टिपण्णी करायची आणि याला त्याला नावे ठेवायची ही या पक्षाची भूमिका आहे. जर गेली पाच वर्षे केडीमएसीत भाजपने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, शांत राहीले होते तर त्यांना वेळीच बाजूला का केले नाही. त्यांच्या टेकूचा आधार घेत सत्ता का उपभोगली? केवळ महापौर आणि स्टॅडींग-सत्तेच्या चाव्या हाताळता याव्यात यासाठीच का? असा सूरही नागरिकांमध्ये आहे.केडीएसमीत बरेच काही केले तरी अद्यापही कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम का आहे? २४ तास पेयजल पुरविण्याची योजना कागदावरच का राहीली, पाण्याचे नियोजन का केले नाही, ३० टक्के पाणी कपात का लादण्यात आली, अद्यापही सुसज्ज पार्कींग स्टँड का नाही, महावितरणची वीज खंडीत समस्या कायम का आहे? पुरेशा स्वच्छतागृहांचा आभाव का आहे. अद्ययावत शैक्षणिक सुविधा का नाहीत. ज्या ग्रामीण भागाबाबत शिवसेना बोलत आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती-झेडपी सेनेकडेच होत्या तरीही तेथे आरोग्य, गृह, पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची एैशीतैशी का आहे. शहरांतर्गत रस्ते अरुंद का आहेत. जेथे काँक्रीटीकरणाचे काम झाले ते अर्धवट का आहे, मानपाड्याच्या ठिकाणी रस्त्याला भेगा का पडल्या. शहरांमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत का चालला आहे? डम्पिग ग्राऊंडची समस्या का निर्माण झाली. हायकोर्टाने का ताशेरे ओढले. प्रदूषणाची समस्या जैसे थे किंबहुना त्याहून अधिक वाढलेली आहे. परिणामी नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. समांतर रस्ता भिजत घोंगडे, ठाकुर्ली उड्डाणपुल प्रश्न जैसे थे, भाजी मंडयांची दुरावस्था, मच्छीमार्केट अद्ययावत नाही. रिक्षा स्टँड (अधिकृत नाहीत), कायदा सुव्यस्था धाब्यावर, खाडी किनारे असुरक्षित, बेसुमार रेती उपसा, कल्याणातील एैतिहासीक वास्तुंची दुरावस्था, श्रीमलंग गडावरील समस्या जैसे थे, अद्ययावत रुग्णालयांचा आभाव, जे आहेत त्या शासकीय रुग्णालयांमध्ये प्रचंड गैरसोयी. रुग्णवाहीका जाण्यासाठी स्पीड झोन नाही. ग्रीन झोनचा आभाव, करमणुकीची साधने नाहीत. मनोरंजन दूरच राहीले. उद्याने-क्रिडांगणे नाहीत. धार्मिक स्थळांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे. ज्येष्ठांच्या समस्या वाढतच आहेत. महिला असुरक्षित दैनंदिन चेन स्रॅचिंगच्या प्रमाणात वाढ. यासह जीवन जगण्यासाठी किमा सुविधांचा आभाव असल्याने ही परीपुर्ण महापालिका आहे का? ज्यावर विशेषत्वाने शिवसेनेने अनेक वर्षे राज्य केले असे नानाविध सवाल कल्याण-डोंबिवलीकरांना आहेत. (प्रतिनिधी)