शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

सिटी आहे, पण ‘सर्व्हे’ नाही

By admin | Published: March 11, 2016 2:31 AM

कल्याण-डोंबिवली शहरांचा सिटी सर्व्हे न झाल्याने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेली नाहीत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी महापालिकेने तीन कोटी रुपये भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरले आहेत.

मुरलीधर भवार,  कल्याण कल्याण-डोंबिवली शहरांचा सिटी सर्व्हे न झाल्याने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेली नाहीत. सिटी सर्व्हे करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी महापालिकेने तीन कोटी रुपये भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरले आहेत. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने सर्वेक्षणासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. त्यावेळी २७ गावे आणि अंबरनाथ व बदलापूर शहरे पालिकेत होती. १९९४ मध्ये अंबरनाथ व बदलापूर पालिकांची राज्य सरकारने स्थापना केली. १९९५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची पहिली निवडणूक झाली. २७ गावातील ग्रामस्थांनी पालिकेला विरोध केल्यानंतर ही गावे राज्य सरकारने वगळली. पुन्हा ती गावे एक जून २०१५ ला पालिकेत समाविष्ट केली. महापालिकेची हद्दी सारखी बदलत राहिली. १९९५ पासून महापालिका क्षेत्राचा सिटी सर्व्हे करावा, यासाठी शिवसेना नगरसेवक रमेश जाधव पाठपुरावा करीत आहेत. सिटी सर्व्हेसाठी महापालिकेने ठाणे जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडे तीन कोटी भरले आहेत. भूमी अभिलेख कार्यालयासाठी कल्याणच्या लोकग्राम संकुलात जागा दिली आहे. असे असताना एक इंच जागेचा सिटी सर्व्हे झालेला नाही. यासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. सर्व्हेचे पोकळ आश्वासन : नगरसेवक जाधव यांनी २०१४ मध्ये सिटी सर्व्हेच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी कल्याण व डोंबिवलीसाठी प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचे पथक नेमून वर्षभरात सिटी सर्व्हेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन भूमी अभिलेखा कार्यालयाने दिले होते. त्या आश्वासनावर जाधव यांनी उपोषण मागे घेतले होते. दिलेले पैसे व्याजासह परत करा : २००७ मध्ये सिटी सर्व्हेसाठी महापालिकेने तीन कोटी भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरले होते. मात्र अजूनही सर्व्हे न झाल्यास हे पैसे व्याजासह महापालिकेस परत करावे, अशी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे.