शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

ठाणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ

By admin | Published: January 10, 2017 6:24 AM

राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत

ठाणे : राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत दोन लाख १२ हजार ३० मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात ५८ लाख १४ हजार ६६९ मतदार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारसंख्येतील ३.७८ टक्के ही वाढ सर्वाधिक असल्याचे येथील उपजिल्हाधिकारी फारोग मुकादम यांनी सांगितले. यात निवडणूक होऊ घातलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात ७९ हजार १२९, तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १३ हजार ६५२ मतदार वाढले आहेत.राज्यातील ही मतदारसंख्येतील वाढ वाखाणण्याजोगी आहे. मयत झालेले, पत्त्यावर नसलेले, स्थलांतर झालेले आदी पाच लाख ५२ हजार मतदार मागील दोन वर्षांच्या कालावधीत कमी करूनही ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत ५८ लाख १४ हजार मतदार आहेत. यात ३१ लाख ८५ हजार ६२६ पुरुष तर २६ लाख २८ हजार ७८३ पहिला मतदार असून २६० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे शहरात पाच पूर्ण मतदारसंघ असून ओवळा-माजिवडा या मतदारसंघाचा काही भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. यामुळे या पाच मतदारसंघांत ७९ हजार १२९ मतदारसंख्या वाढलेली आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंख्येत वाढ झालेली असून ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७.२४ टक्के मतदारसंख्या वाढलेली आहे. कोपरी-पाचपाखाडीत ४.८९ टक्के, ठाणे ४.५१ टक्के, मुंब्रा कळवा ६.८० टक्के, ऐरोली ०.४१ आणि बेलापूर ०.८३ टक्के मतदार वाढले आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चार हजार ६९८ मतदार कमी झाले आहेत. सुमारे १.१७ टक्के मतदार या मतदारसंघाचे कमी झालेले असून त्यात सध्या तीन लाख ९८ हजार ३७२ मतदार आहेत. याउलट, भिवंडी ईस्टमध्ये १० टक्के मतदार वाढलेले असून भिवंडी वेस्टमध्येदेखील ८.४० टक्के मतदारसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. याप्रमाणेच निवडणूक होऊ घातलेल्या उल्हासनगर मतदारसंघातदेखील ५.४८ टक्के मतदारसंख्या वाढलेली असून दोन लाख ६२ हजार ८३७ मतदार या महापालिका क्षेत्रात आहे. एक वर्षाच्या कालावधीत नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे मतदार संख्येतील कमीअधिक फरक दिसून येत आहे. मतदारयादीतील नावे कमी करण्यापूर्वी संबंधित महापालिकेच्या स्थायी समितीमध्येदेखील ठराव घेतला जातो. ठिकठिकाणी जनजागृतीही केली जात असल्याचे मुकादम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)