शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार पत्ता नाही; पण, भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच!

By अजित मांडके | Published: April 13, 2024 5:57 PM

केळकरांनी निर्माण केले स्वकीयांनाच आव्हान.

ठाणे : ठाणे लोकसभेतून महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरुन अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. परंतु दुसरीकडे शिंदेसेना आणि भाजपमधून अनेक इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. त्यात भाजपकडून संजीव नाईक यांनी उमेदवारी जाहीर नसतांनाही प्रचाराला सुरवात केली असतांनाच आता ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मला उमेदवारी मिळाल्यास मी लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच करीत शिवसेनेला आव्हान देतांनाच  आपल्याच पक्षातील स्वयकींना आव्हान देत डिवचण्याचे  काम केल्याने आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी तो आता ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. हा बालेकिल्ला का हवा त्यासाठीचे दाखले देखील भाजपकडून दिले जात आहेत. परंतु अद्यापही हा मतदार संघ कोणाच्या पारड्यात जाणार याचे चित्र स्पष्ट नाही. असे असले तरी स्थानिक पातळीवर आता शिंदे सेना आणि भाजपकडून मेळावे घेण्यास सुरवात झाली आहे. कधी महायुतीच्या माध्यमातून तर कधी पक्षनिहाय मेळावे घेतले जात आहेत. शिंदे सेनेकडून आजही प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. तर मेळाव्याच्या माध्यमातून हे चौघेही जनतेच्या समोर जात आहेत. शिवाय आमच्यातील कोणालाही उमेदवारी मिळाली तरी देखील आम्ही त्याचे काम करण्यास तयार असल्याचे ते जाहीरपणे सांगत आहेत. किंबहुना एकमेकांना आव्हान निर्माण करतांना कुठेही दिसून येत नाहीत. त्यातही आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, महायुतीच्या उमेदवाराला आम्हाला निवडून आणायचे आहे, अशा आणा भाकाही दिल्या जात आहेत.

तिकडे भाजपने दावा करुन शिंदे सेनेचा त्रास वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अद्यापही हा मतदार संघ कोणाच्या ताब्यात जाईल याचे चित्र स्पष्ट होत नाही. परंतु भाजपमधून देखील विनय सहस्त्रबुध्दे, संजीव नाईक यांच्या नावे आघाडीवर आहेत. त्यांनी देखील वयक्तीक पातळीवर प्रचार सुरु केला आहे. संजीव नाईक यांनी तर थेट मिराभार्इंदर, नवीमुंबई भागात जाऊन आपणच उमेदवार असल्याचे जवळ जवळ जाहीर करीत शिवसेनेला आव्हान उभे केले आहे.

असे असतांनाच आता चर्चेत नसलेले परंतु ठाण्यात शिंदे सेनेला सतत अंगावर घेणाºया भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी आता मी सुध्दा रेसमध्ये असल्याचे सुतोवाच केले आहे. पक्षाने संधी दिली तर मी सुध्दा लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे केळकर यांनी शिंदेसेनेला आव्हान तर दिले आहेच, शिवाय या मतदार संघावर भाजपचा दावा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु असे असले तरी देखील शिवसेनेसोबतच त्यांनी आपल्याच पक्षातील संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुध्दे यांना देखील एक प्रकारे डिवचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वयीकांपुढेच त्यांनी आता आव्हान उभे करुन त्यांनी उलट सुलट चर्चांना दारे मोकळी करुन दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये आपसातच आता तिकीटासाठी रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा राजकीय वुर्तळात सुरु झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे