शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

महाराष्ट्रासमोर 'आदर्श' घालून देणाऱ्यांच्या विधानांना महत्व देण्याची गरज नाही, म्हस्केंचा अशोक चव्हानांवर निशाणा

By अजित मांडके | Published: September 29, 2022 3:01 PM

"अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेली विधाने म्हणजे हाय कमांडचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न"

ठाणे: शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर 'आदर्श' घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार, आशा बातम्या येत आहेत, जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे यांच्यावर स्वैर आरोप करत असून त्याला फार महत्व देण्याची गरज नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. 

त्यासोबतच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, खैरे हे ज्येष्ठ नेते असले तरीही गेली काही वर्षे निवडणूक हरल्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ऐकली असती तर ते पक्षासोबत किती एकनिष्ठ आहेत हे सगळ्यांनाच समजलं असतं, त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या पाया पडतानाचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र आता ते मातोश्रीचे मन जिंकण्यासाठी वाट्टेल ते बरळत आहेत. दुसरीकडे अंबादास दानवे हे यंदा पहिल्यांदा टेम्भी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आले होते. यापूर्वी कधीही ते ठाणे शहरात या देवीच्या दर्शनाला आले नव्हते. यावेळी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी या नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. 

देवीच्या दर्शनासाठी आल्याने त्यांचा उचित मान ठेवण्यात आला. दिघे साहेबांच्या पश्चात या देवीच्या नवरात्रोत्सवाचो आयोजन आणि त्यानी सूरू केलेले उपक्रम आदरणीय एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगावे असा सल्ला म्हस्के यांनी दिला. त्यासोबतच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हबाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याने या लढ्यात देवी कोणासोबत आहे ते स्पष्ट झाले असल्याचेही म्हस्के म्हणाले.  

कोणतेही विचार नसलेली लोकं वाट्टेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना फार महत्व देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाthaneठाणेAshok Chavanअशोक चव्हाणAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे