शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

कोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:21 AM

कोरोनामुळे खबरदारी : सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रमांचा संकल्प

स्रेहा पावसकर ।

ठाणे : कोरोनामुळे यंदा कोणतेही सण, उत्सव साजरे झालेले नाहीत. अनावश्यक खर्च टाळून आणि सामाजिक भान राखत गणोशोत्सव साजरा झाला. त्याच धर्तीवर ठाण्यात पुढील महिन्यात नवरात्रोत्सवही होणार आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा, दांडियाचा घुमर न घुमता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजिले जाणार आहेत.

कोरोनामुळे यंदा गर्दी होतील, असे सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आयोजित करण्यावर बंदी आहे. त्याचा परिणाम यंदा सर्वच सणउत्सवांवर पाहायला मिळाला. गुढीपाडवा, दहीहंडी, वारी, गणोशोत्सव असे सगळे सणउत्सव दरवर्षीप्रमाणे थाटात साजरे न होता केवळ शास्त्र म्हणून मोजक्या माणसांच्या उपस्थितीत छोटेखानी पद्धतीने साजरे झाले. अनेक ठिकाणी तर ते रद्दच झालेच. दहीहंडी, गणोशोत्सवाप्रमाणेच ठाण्यात नवरात्रोत्सवाचीही धूम असते. देवीच्या आगमनाबरोबरच नऊ दिवस चालणारे गरबा, दांडिया-रास तरुणाईला आकर्षित करणारे ठरतात. मोठ्या संख्येने आणि वेशभूषेसह तरुणाई ठाण्यातील विविध मंडळांच्या गरबा-रासमध्ये सहभागी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाण्यात हे दांडिया-रास रंगणार नाहीत. नवरात्रीचा जागर होणार नाही. परंतु सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याकडे आयोजकांचा कल दिसतो आहे. खारीगाव-पारसिकनगर भागातील नवरात्रोत्सव यंदा स्थगित करण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला आहे. संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार प्रताप सरनाईक आणि संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार रवींद्र फाटक यांनीही यंदा आपण नवरात्रोत्सव थाटात साजरा करणार नसून त्याऐवजी सामाजिक उपक्रम आयोजिणार असल्याचे सांगितले.नवरात्रोत्सव साजरा करण्याची इच्छा आहे. मात्र, शासकीय नियम पाहता यंदा दांडिया किंवा गरबा-रास तर आयोजिणार नाही. त्याऐवजी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने इतर सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजिणार आहोत.आ. रवींद्र फाटक, अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठानदरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतो. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उत्सव साजरा करणार नाही. उलट त्यासाठी जो खर्च होतो त्याच रकमेतून एक लाख मास्क आणि सॅनिटायझरवाटप करण्याचे आम्ही ठरवले आहे. विविध आरोग्यविषयक उपक्रमही आम्ही राबवतो आहोतच.- आ. प्रताप सरनाईक,अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान

टॅग्स :thaneठाणेNavratriनवरात्री