शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कल्याण-डोंबिवलीत पाणी दरवाढ नाही

By admin | Published: March 02, 2016 1:47 AM

शहरात नागरिक पाणीटंचाईने त्रस्त असताना त्यांच्यावर दरवाढ लादून त्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत खुद्द सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच महासभेत विरोध

कल्याण : शहरात नागरिक पाणीटंचाईने त्रस्त असताना त्यांच्यावर दरवाढ लादून त्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत खुद्द सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच महासभेत विरोध केल्याने सोमवारी ही दरवाढ फेटाळण्यात आली. आता पावसाळ््यानंतर दरवाढीचा विचार होणार आहे. स्थायी समितीने पाणी दरवाढीचे टप्पेही ठरविले होते. पण ज्या मालमत्ताधारकांनी मीटर बसविले आहेत, त्यांच्यावर दरवाढ लादण्यात काय मतलब आहे. ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत, त्यांना सरासरी शंभर रुपये दराने पाणी बिल आकारले जाते. त्यामुळे मीटर असलेल्या पाणी ग्राहकांना एक न्याय आणि मीटर नसलेल्यांना वेगळा, असा भेदभाव करुन कसे चालेल असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सध्या ३० टक्के पाणी कपातीमुळे परिस्थिती बिकट आहे. पुरेसे पाणी देत नसतांना दरवाढ कशाच्या आधारे लागू केली जात आहे, असा सवाल शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप आणि भाजप नगरसेवक राहुल दामले यांनी उपस्थित केला. सदस्यांचा दरवाढीला असलेला विरोध लक्षात घेता महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पाणी दरवाढ तूर्त स्थगित करुन फेटाळल्याचे जाहीर केले आणि नागरिकांना पुरेसे पाणी दिल्यावरच दरवाढीचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. कोण किती पाणी वापरते, याचे कोणतेही मोजमाप पालिकेकडे नाही. त्याचे कारण देताना शंभर टक्के मीटरींग झालेले नाही, याकडे बोट दाखविले जाते. पालिकेची सध्याची दरवाढ मान्य केली असती, तर मीटरप्रमाणे बिलिंग होत असलेल्या २० हजार जणांनाच त्याता भूर्दंड सोसावा लागला असता. ज्यांना सरासरी बिले दिली जातात, त्यांना त्याची सक्ती लागू झाली नसती. जास्त पाणी वापरणाऱ्यांना जास्त बिल भरावे लागेल, असा मुद्दा स्थायीच्या प्रस्तावात होता. ज्यांचा वाणिज्य वापर आहे, त्यांनाच पाणी जास्त लागते. त्यांच्यासाठी दरवाढ योग्य होती. मात्र सध्याच्या स्थितीत त्याचा फटका सामान्य पाणी ग्राहकांना बसला असता. महापालिका क्षेत्रात एक लाख नळ जोडण्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महापालिकेने आत्तापर्यंत ६० हजारपेक्षा जास्त नळ जोडण्यांवर मीटर बसविले आहेत. त्याचे काम चेतक कंपनीला दिले आहे. अजून ४० टक्के नळ जोडण्यांना मीटर बसविण्याचे काम शिल्लक आहे.महापालिका प्रशासनाने डिसेंबर १५ पर्यंत शंभर टक्के मीटर बसविले जातील, असे जाहीर केले होते. ती डेडलाईन संपली तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. ६० हजार नळजोडण्यांना मीटर लावले असले, तरी मीटर प्रमाणे पाण्याचे बिल केवळ २० हजार जोडण्यांचेच होते आहे. अन्य लोकांना पाण्याची बिले मीटरप्रमाणे येत नाहीत. वीज वितरण कंपनी प्रत्येक झोपडीला वीज जोडणी देते. त्यांचे बिलही महिन्याला नियमित पाठविते. त्यासाठी आऊटसोर्सिंगचा वापर करते. त्यामुळे वीजचोरीचे प्रमाण घटले आहे. त्याचपद्धतीने पाणीही मोजून द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही, त्याची गळती थांबविता येईल. तसेच कोण किती पाणी वापरते, तेही कळेल. जितका वापर तितकेच बिल दिले गेल्याने पाणीबिलात भेदभाव होणार नाही. वीज वितरण कंपनीच्या धर्तीवर महापालिकेने प्रत्येक घराला पाण्याचा मीटर बसविला पाहिजे. दंड आकारुन बेकायदा नळ जोडण्याही नियमित केल्यास महापालिकेचा बुडणारा महसूल आणि पाण्याची गळती रोखता येईल, अशी अपेक्षा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली आणि त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.