शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

अंबरनाथमध्ये प्रशासकीय इमारतीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:45 AM

आधीच नव्या इमारतीच्या बांधकामास विलंब होत असल्याने पुन्हा दोन मजले वाढविण्याचे काम केल्यास पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी ते काम पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर आता सत्ताधाºयांनीही आहे ते काम उरकण्याची घाई सुरूकेली आहे.

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ नगरपालिकेने जुन्या प्रशासकीय इमारतीच्या मागच्या मैदानावर नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू केले आहे. मात्र, या इमारतीचे जे बांधकाम सुरू आहे, त्यात निम्मेच कार्यालय स्थलांतरित होणार आहे. संपूर्ण पालिकेचे प्रशासन या इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी आणखी एक किंवा दोन मजल्यांच्या इमारतीची गरज भासणार आहे. मात्र, या इमारतीचे दोन मजले वाढविण्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या इमारतीच्या वाढीव मजल्याबाबतही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आहे ती इमारत पूर्ण करून त्यात काही कार्यालये आणि सभागृह सुरू करण्याचा विचार पालिकेने पक्का केला आहे. त्यामुळे आता पालिकेची प्रशासकीय इमारत दोन टप्प्यांत पूर्ण होणार, हे आता निश्चित झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम हे संथगतीने सुरू आहे. त्यातच या इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे. पालिकेला सरकारमार्फत मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून आणि पालिकेच्या अतिरिक्त निधीतून याच प्रशासकीय इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याचा प्रस्ताव याआधीच मांडला होता. सध्या सुरू असलेल्या तीन मजली इमारतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून काम सुरू असताना उर्वरित दोन मजले वाढविणे शक्य होते. त्या अनुषंगाने पालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाबाबत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेत याच विषयावर चर्चाही झाली. मात्र, दोन मजले वाढविण्यासाठी पुन्हा नवीन निविदा प्रक्रिया करावी, अशी मागणी शिवसेनेच्या एका गटामार्फत करण्यात आली. त्यामुळे हा विषय लांबणीवर पडला. सध्या सुरू असलेल्या कामाचाच एक भाग म्हणून त्याच कंत्राटदाराकडून जुन्याच दराने आणखी दोन मजले वाढविण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेचा एक गट तयार होता. तो निर्णय झाला असता तर एकाच कंत्राटदाराकडून कमी दरात वाढीव बांधकाम करणे शक्य होते. मात्र, त्यास विरोध झाल्याने आता प्रशासकीय इमारतीच्या वाढीव दोन मजल्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

आधीच नव्या इमारतीच्या बांधकामास विलंब होत असल्याने पुन्हा दोन मजले वाढविण्याचे काम केल्यास पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी ते काम पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर आता सत्ताधाºयांनीही आहे ते काम उरकण्याची घाई सुरूकेली आहे. पालिकेचा कार्यकाळ संपण्याआधी इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याची घाई सुरू आहे.

प्रशासकीय इमारत उभारताना तेथे किती कार्यालये आणि सभागृह कशा पद्धतीने निर्माण होणार, याची कल्पना असतानाही हे कार्यालय कमी पडणार, हे लक्षात येण्यास विलंब लागला. इमारतीचा मूळ आराखडाच चार किंवा पाच मजली करणे गरजेचे होते. आता मात्र निम्मे कार्यालय नव्या आणि निम्मे कार्यालय जुन्या इमारतीत ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

नवी प्रशासकीय इमारत उभारताना या इमारतीसमोर मोकळी जागा ठेवण्यात येणार होती. मात्र, कार्यालयाचे नियोजन पाहता जुनी इमारत आणखी दोन वर्षे तरी तोडता येणार नाही, हे निश्चित आहे. नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीनंतर सर्व कार्यालय तेथे स्थलांतरित होऊन जुनी इमारत तोडली जाईल, ही धारणा होती. नव्या इमारतीत सभागृह, काही विभागांचे कार्यालय आणि सभापतींचे कार्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. मूळ प्रस्तावानुसार सर्व कार्यालये या तीन मजली इमारतीत स्थलांतरित होणार होती. मात्र, सध्या कार्यालय विस्तारीकरण करून दोन मजले वाढविण्याची वाट पाहणे सुरू आहे.