ठाणे : ठामपाच्या पाणी पुरवठा योजनेमधील अत्यावश्यक दुरु स्तीची कामे करायची असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.या कालावधीत घोडबंदर रोड परिसर, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, सिध्देश्वर, ऋतु पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स, कळवा, खारेगांव, रेतीबंदर, मुंब्रा, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, सावरकरनगर, रामनगर, रुपादेवीपाडा, किसननगर, समतानगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, सुरकरपाडा, लक्ष्मीनगर, चिरागनगर, गांधीनगर, वसंतविहार येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
बुधवारी ठाण्यात पाणी नाही
By admin | Published: July 27, 2015 11:31 PM