शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

कुठलीही गोष्ट सांभाळून करावी लागते, विनोद तावडे यांची भूमिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 6:33 AM

दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या.

ठाणे : दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या. पूर्वी नाही, पण हल्ली अशा ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सांभाळून करावी लागते. चांगले करतानाही कोणाला अनावश्यक कोलीत मिळणार नाही, याची काळजी घ्यावी लागते, अशा शब्दात सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात आपली बाजू मांडली.व्यास क्रिएशन्स् आणि थिएटर कोलाजच्यावतीने भगवती मंदिराच्या टेरेस हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर लेखिका सुमन नवलकर, श्री. वा. नेर्लेकर, निलेश गायकवाड, पल्लवी वाघ उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तावडे बोलत होते.मराठी वाचक कमी झाला, असे आपण ऐकतो. मात्र साहित्य संमेलनांमध्ये आजही ग्रंथ दालनातून कोट्यवधी रूपयांच्या पुस्तकांची विक्री होते आणि अनेक जण ही पुस्तके त्यांना त्यांच्या परिसरात मिळत नाहीत, म्हणून घेतात. त्यामुळे वाचनाची आवड प्रचंड आहे. मात्र पुस्तके पोहोचत नाही म्हणून वाचक नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. वाचकांपर्यंत साहित्य कसे पोचेल, याचा विचार केला तर मराठी साहित्याचा वाचक कमी झाला, असे म्हणण्याची वेळ येणार नाही. जेव्हा भिलारला पुस्तकांच गावं निर्माण करावं अशी संकल्पना मांडली, तेव्हा त्याबाबत अनेकांनी शंका घेतली. आज तिथे शाळांच्या सहली जातात. वाचनप्रेमी तिथे जाऊन तासन्तास पुस्तक वाचतात. घरातील सुखदु:ख विसरून तेथील लोकही पर्यटक, पुस्तकप्रेमींची सेवा करतात. इतके त्या गावाने आणि गावकºयांनी स्वत:ला पुस्तकाच्या, वाचनाच्याप्रती समर्पित केले आहे आणि लोकांनीही पुस्तकाच्या गावाची संकल्पना उचलून धरली आहे. ही महाराष्टÑाची सांस्कृतिक भूक आहे. आजची मराठी पिढी इंग्लिशमध्ये शिकते आहे. मात्र पुलं, वपु म्हणजे काय? हे त्यांना कळत नाही. आपले साहित्य संचित नवीन पिढीने गमावता कामा नये. त्यांनी ते पुढे नेत राहिले पाहिजे. त्यासाठी तरूण पिढीला आकर्षित करणारे साहित्यही निर्माण करण्याची गरज आहे, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.यावेळी व्यास क्रिएशनने अभिनय कट्टा, थिएटर कोलाज, नुपूर नृत्यालय, नवजीवन विद्या मंदिर, भारतीय जनता रिक्षा चालक मालक संघ यांना पुस्तकांचे संच भेट दिले. थिएटर कोलाजच्या मुलांनी दिलेल्या प्रतिकात्मक ग्रंथपेटीचे तावडे यांनी उद््घाटन केले आणि बच्चेकंपनीने त्यातील पुस्तके लुटली.टीएमटीवर कोणाचा भरवसा हाय काय?ज्या ठाण्यात आयुक्तांनी की आणखी कोणी रिक्षावाल्यांवर दांडगाई केली, ते संजय वाघुलेंना चांगले माहित आहे. परंतु अशा रिक्षाचालकांना आज या उपक्रम सामावून घेतले हे विशेष. ठाणे रेल्वे स्थानकावर रात्री रिक्षावाले नसतात, तेव्हा त्यांची गरज जाणवते. टीएमटीवर कोणाचा भरोसा हाय काय? अशा शब्दांत तावडे यांनी रिक्षाचालकांची पाठराखण करत टीएमटीच्या व्यवस्थापनाला चिमटे काढले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे