शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

ठाण्यात जाणवतोय कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 9:14 AM

दुसऱ्या डोससाठी पुरेसा साठा उपलब्ध : ठामपाचा दावा, कोव्हॅक्सिनचेही मिळाले १० हजार डोस 

ठाणे  :  कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. कारण ठाण्यात कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपत आल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आधी ज्यांनी ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना या लसीचा दुसरा डोस मिळणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. परंतु, कोव्हिशिल्डचा पुरेसा साठा करून ठेवला असून दुसरा डोस वेळेवर दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.  केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वृद्ध, फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील विविध व्याधीग्रस्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मनपाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शहरात खासगी ११ व ४२ शासकीय अशा ५३ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली आहेत. त्यानुसार, कोव्हिशिल्ड लसीद्वारे दररोज साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण होते. त्यानुसार आतापर्यंत ८२ हजार नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सध्या कोव्हिशिल्डचा साठा जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच उपलब्ध असल्याची माहिती पुढे आल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. तसेच, लस पुरवठ्याबाबत आढावा घेत शासन दरबारीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी आयुक्तांनी १० हजार कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा आल्याचे स्पष्ट करून त्याबाबतच्या प्रशिक्षणाला दुजोरा दिला. मात्र, यापूर्वी ८२ हजारांहून अधिक नागरिकांना पहिला डोस कोव्हिशिल्डचा दिलेला असताना त्यांना दुसरा डोस अन्य लसीचा चालणार नाही. तेव्हा, कोव्हिशिल्ड लस घेतलेले नागरिक धास्तावले आहेत. परंतु, यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की, आधी ज्या ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डची लस घेतलेली आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी त्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्यांना कोव्हिशिल्डचीच लस दिली जाईल.

लसीचा साठा मिळाल्याने डोंबिवलीत लसीकरण सुरू - - डोंबिवली : कोरोनाच्या लसीच्या तुटवड्यामुळे चार दिवसांपासून खाजगी रुग्णालयांत ठप्प झालेली लसीकरणाची मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयासह सात खासगी रुग्णालयांत सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण सुरू झाले. बहुतांशी ठिकाणी ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना लस दण्यात आली. एमआयडीसीतील एका खाजगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले की, केडीएमसीकडून चार दिवसांनी आज लसीचा साठा मिळाला. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या १५० जणांना दिवसभरात लस दिली गेली.  

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या