शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:18 AM

संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते.

ठाणे : संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते. पारंपरिक पद्धतीने होणाºया खरेदीचा ट्रेंड यंदा बदललेला दिसला.पारंपरिक आकाशकंदिल, चमचमत्या दिव्यांच्या माळा, सुबकतेबरोबरच आकर्षक रंगसंगतीने सजलेल्या रांगोळ््या यामुळे ही दिवाळी बहुरंगी झाल्याचे दिसत होते. दिवाळीनिमित्त होणारी सोन्याची, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी यंदा फारशी दिसून आली नाही. त्याऐवजी कपडे, इमिटेशन ज्वेलरी, पादत्राणे, घर सजावटीच्या वस्तू, फुले-पणत्या यांच्या खरेदीचा ट्रेंड भरपूर होता.खरेदीसोबतच हॉटेलिंगचा ट्रेंड यंदा भरपूर होता. खरेदी झाल्यावर थकली-भागलेली पावले हॉटेलांकडे वळलेली दिसत होती. सहकुटुंब भोजनचा आस्वाद घेणारी कुटुंबे असल्याने या काळात दुपारी आणि संध्याकाळीही हॉटेल गर्दीने तुडुंब भरलेली होती. तेथेही रांगा लावण्याची वेळ आली होती.रेडीमेड फराळाला पसंतीघरोघरी होणाºया फराळाच्या पदार्थांसोबतच यंदा घरगुती चवीच्या, बचत गटांनी बनवलेल्या, गृहउद्योगांत मिळणाºया फराळाच्या पदार्थांना भरपूर मागणी होती. दिवाळीपूर्वी आॅर्डर देऊन ज्यांनी फराळाचे बुकींग केले होते त्यांच्यासोबतच आयत्यावेळी पदार्थ खरेदी करणाºयांचा ट्रेंडही दररोज पाहायला मिळत होता. त्यातही भाजणीची कडबोळी, पाकातले चिरोटे, गुळाचे जाळीदार अनारसे अशा पारंपरिक पदार्थांना अधिक मागणी होती.रांगोळीने टाकली कातमध्यंतरीच्या काळात भव्य रांगोळीचा ट्रेंड होता. आता मात्र नाजूक, आकर्षक रंगसंगती, साच्यातून काढलेल्या रांगोळ््यांचा ट्रेंड दिसतो आहे. त्यासोबतच एखाद्या विषयाची थीम घेऊन त्यावर काढलेल्या रांगोळ््याही लक्ष वेधून घेत आहेत.ंमुलांच्या परीक्षा संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवारनंतरच दिवाळीच्या खरेदीने वेग पकडला. तोवर अनेकांच्या हाती बोनस पडला होता. पगारही झाला होता.सुती कपड्यांना मागणीसध्या आर्द्रता प्रचंड वाढल्याने घामाच्या धारांचा पाऊस सर्वजण अनुभवत आहेत. त्यामुळेही असेल कदाचित पण यंदाच्या खरेदीत सुती (कॉटन) कपड्यांना अदिक पसंती दिली गेली. मुलांचे कपडे, साड्या, पुरूषांचे शर्ट यात कॉटनचा ट्रेंड अधिक होता.मिष्टान्नातही जपली परंपराएरव्ही मिष्टान्नात बंगाली मिठाईला किंवा जिलेबीला मिळणाºया पसंतीपेक्षा यंदा पुरणपोळी, सांजापोळी, खव्याची पोळी, बासुंदी, गुलाबजाम, आम्रखंड, उकडीचे मोदक अशा पारंपरिक पदार्थांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :diwaliदिवाळी