ठाणे : पावसाळ्यातील समुद्राच्या उधाण भरतीच्या दिवशी मुंबईत जर खूप पाऊस पडला तर शहरात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी जास्त काळजी घ्यावी लागते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या उधाण भरतीचे दिवस व वेळा पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. ही उंची समुद्राच्या पाण्याच्या भरतीची असते, लाटांची उंची नसते हेही श्री. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
(१) बुधवार ५ जून सकाळी ११-५१ (२) गुरुवार ६ जून दुपारी १२-०५ (३) शुक्रवार ७ जून दुपारी १२-५०(४) शनिवार ८ जून दुपारी १-३४ (५) रविवार २३ जून दुपारी १-०९ (६) सोमवार २४ जून दुपारी १-५३ (७) मंगळवार २५ जून दुपारी २-३६ (८) सोमवार २२ जुलै दुपारी १२-५० (९) मंगळवार २३ जुलै दुपारी १-२९(१०) बुधवार २४ जुलै दुपारी २-११ (११) गुरुवार २५ जुलै दुपारी २-५१ (१२) सोमवार १९ ॲागस्ट सकाळी ११-४५(१३) मंगळवार २० ॲागस्ट दुपारी १२-२२ (१४) बुधवार २१ ॲागस्ट दुपारी १२-५७ , उत्तररात्री १-१८ (१५) गुरुवार २२ ॲागस्ट दुपारी १-३५ , उत्तररात्री २-०३ (१६) शुक्रवार २३ ॲागस्ट दुपारी २-१५ (१७) मंगळवार १७ सप्टेंबर सकाळी ११-१४ (१८) बुधवार १८ सप्टेंबर सकाळी ११-५० , रात्री १२-१९ (१९) गुरुवार १९ सप्टेंबर दुपारी १२-२४ , उत्तररात्री १-०३ (२०) शुक्रवार २० सप्टेंबर दुपारी १-०२, उत्तररात्री १-४७ (२१) शनिवार २१ सप्टेंबर दुपारी १-४२ , उत्तररात्री २-३३