शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 6:59 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजू पाटील हे नेतेमंडळी रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या गुरुवारी म्हणजे, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात राहणार असल्याने दुर्मीळ असा ‘गुरुपुष्यामृत योग’ असून हाच योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, भाजपचे आ. संजय केळकर, अविनाश जाधव, राजू पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार तर अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात हजेरी लावणार आहेत.

अनेकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज घेतले. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे हे निवडणूक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी शरद पवार गटाने केली. परंतु, उद्धवसेना या जागेसाठी आग्रही आहे. 

ठाकरे, पवार ठाण्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाणे विधानसभेतील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने या दोघांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हजेरी लावणार आहेत. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज दाखल करतील. स्वत: शरद पवार हे हजेरी लावणार आहेत. 

चांगला मुहूर्त

२४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने ‘गुरुपुष्यामृत योग’ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून (सकाळी ६.३७) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत (शुक्रवारी सकाळी ६.३७) हा योग आहे.

अजित पवार गटाचा कल्याण ग्रामीणवर दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे उमेदवार म्हणून पक्षाचे विद्यमान आ. राजू पाटील यांचे नाव घोषित केले आहे. त्याचबरोबर महायुती मधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. जगन्नाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे असल्याचा दावा केला.

कल्याण ग्रामीणमध्ये महायुुतीचा आमदार नाही. त्याठिकाणी मनसेचा आमदार आहे. मनसे महायुतीमध्ये सामील नाही. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाला उमेदवारी मिळावी, असे पत्र जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी अजित पवारांना दिले. या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते हे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. मंगळवारी दुपारी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक दिल्लीला गेल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवा