शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

ठाण्यात १४ मेपर्यंत आंदोलनासह जमावासाठी बंदी आदेश राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:14 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे आणि साठा करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला बंदी घालण्यात आल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.आपल्या मनाई आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा आणि उपोषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तशी काही आंदोलनेही सुरु आहेत. येत्या १० मे रोजी रोजी शब-ए-कदर त्यापाठोपाठ १३ मे रोजी परंपरेने येणारी शिवजयंती तसेच १४ मे रोजी रमजान ईद त्याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असे सण आणिस उत्सव पार पडणार आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) आणि ( ३) अन्वये जिवित तसेच वित्त सुरक्षित राहण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचे यामध्ये म्हटले आहे.* असा आहे आदेश-तलवारी, भाले, दंड, बंदुका आणि लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. तसेच क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे, साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींना मनाई राहणार आहे. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे. किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन अस्थिर होईल, अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा प्रति घोषणा देणे आदी कृत्यांना मनाई केली आहे.यांना मनाई आदेश लागू नाही-सरकारी नोकर, लग्न कार्यासाठी जमलेले लोक, अंत्यसंस्कारासाठी काढलेली मिरवणूक, न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका आदीेंना हा मनाई आदेश लागू राहणार नाही. हा आदेश आधी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला होता. गुरुवारी यामध्ये सुधारणा करुन तो ३० एप्रिल ते १४ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात वाढविण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी