डोंबिवली : कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पाच वर्षांत तीन हजार ३४५ कोटींच्या प्रकल्पांची कामे मंजूर झाली असून ती अमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहे. यात प्रामुख्याने ठाणे व दिवा दरम्यान पाचव्या - सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून २०२० च्या आधी पूर्ण होणार आहे. लोकलच्या ५० हून अधिक फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून अंबरनाथ व कोपर स्थानकांतील होम प्लॅटफॉर्मचे काम मार्च २०२०पर्यंत पूर्ण होणार आहे.
कोपर स्थानकात ठाण्याकडील पादचारी पूल व डोंबिवली स्थानकातील कल्याणकडील पादचारी पुलाचे काम पावसाळा संपताच सुरू करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांनी सोमवारी झालेल्या विभागीय रेल्वे बैठकीत दिली. उपनगरी रेल्वेच्या फेºया वाढवून प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंगच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला असता या प्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक बनवण्याचे काम पूर्ण झाले असून हे काम सहा महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे एक्सप्रेस व लोकल गाड्यांचे सेग्रीगेशन होऊन लोकल गाड्यांचे फेºयांमध्ये वाढ होऊन सदर कामाचे एमयूटीपी-३ए अंतर्गत या प्रकल्पासाठी ९६१ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
१५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण सातत्याने मागणी करीत असल्याचे खा. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले असता एमयूटीपी-३ए अंतर्गत १२ डब्यांच्या सर्व गाड्या १५ डब्यांच्या करण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले.