शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सेनेत आता आणखी वाद पेटणार?

By admin | Published: March 11, 2016 2:33 AM

ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, सेनेच्या नगरसेवकांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी महापालिकेत खमक्या असा एकही पदाधिकारी नाही.

ठाणे : ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, सेनेच्या नगरसेवकांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी महापालिकेत खमक्या असा एकही पदाधिकारी नाही. त्यामुळे प्रत्येक महासभेला विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर हावी होत असल्याचेच दिसत आहे. विशेष म्हणजे सभागृहात समतोल राखण्याची जबाबदारी असणाऱ्या सभागृहनेत्या या विविध मुद्यांवर सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर फारशी खमकी भूमिका बजावत नसल्याने पक्षासह इतर नगरसेवकांच्या अडचणींत मात्र भर पडत असल्याचे मत आता शिवसेनेचेच नगरसेवक व्यक्त करू लागले आहेत. अनेक प्रस्तावांच्या फायलींवर सभागृहनेत्यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित असताना त्यावरदेखील अद्याप स्वाक्षरी न झाल्याने काही महत्त्वाचे प्रस्ताव अद्यापही मार्गी लागले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या इतर नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. ठाणे महापालिकेत सत्ता असूनही अनेक मुद्यांवर शिवसेनेचे नगरसेवक झगडताना दिसत आहेत. पाणीप्रश्न असो अथवा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रश्न, कळवा रुग्णालयाचा प्रश्न असो, शहरातील धोकादायक इमारतींचा, ठामपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टॅब असो, परिवहन सेवेचा प्रश्न असो, यावर महापालिकेत कोणताही ठोस असा निर्णय होताना दिसला नाही. मुळात या मुद्यांवर नेमकी काय भूमिका घ्यायची, यावर सेनेचे नगरसेवक गोंधळलेले आहेत. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य काढून खंभीर अशी भूमिका घेण्याचे काम हे सभागृहनेत्याचे मानले जाते. मुळात याच ठिकाणी विद्यमान सभागृहनेत्या कमी पडत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. याबाबत, आपल्या पक्षातील नगरसेवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याची भूमिका सभागृहनेत्यांची असते. परंतु, आजच्या घडीला असा संवाद सेनेच्या नगरसेवकांमध्ये आणि सभागृहनेत्यामध्ये होताना दिसत नाही. अगदी नगरसेविकांशीही असा संवाद होताना दिसत नाही. त्याही त्यांच्यापासून लांब राहण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. मागील सहा महिन्यांपासून महासभेत मंजूर झालेल्या अनेक प्रस्तावांच्या फायलींवरही सभागृहनेत्यांच्या स्वाक्षरी न झाल्याने ते प्रस्तावही मार्गी न लागल्याने अनेक नगरसेवकांत त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे गरजेचे असताना केवळ काहीतरी बोलून वेळ मारून नेतानाच त्या दिसून येतात. परिणामी, सभागृहात पक्षाची अशी भूमिका अभ्यासपूर्णरीत्या मांडणाऱ्या एखाद्या सदस्याची या पदावर निवड करावी, अशी मागणी आता पक्षाचे सदस्य स्थानिक नेतृत्वाकडे करत आहेत. (प्रतिनिधी)