अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अरे बोल बजरंग बली की जय म्हणत आज ठाणे पोलीस आयुक्तालयात दहीहांडी उत्सवाची धुम पहावयास मिळणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात यंदा ११४७ खाजगी आणि २८४ सार्वजनिक अशा तब्बल १ हजार ४३१ दहीहांडी बांधल्या जाणार आहेत. तर १३३ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची धुम पहावयास मिळाली आहे. त्यातही ८८ ठिकाणी पथक मिरवणुक काढली जाणार आहे.
दहीहांडी उत्सव हा राज्यातील इतर शहरापेंक्षा ठाण्यात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणून याकडे पाहिले जाते. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली अंबरनाथ बदलापुर आदी ठिकाणी देखील आता दहीहांडीचा गाजावाजा सुरु झाला आहे. त्यातही मागील काही वर्षात या उत्सवाला देखील ग्लॅमर मिळू लागल्याने अनेक सेलीब्रेटी ठाण्याकडे येतांना दिसत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षात ठाणे पोलीस आयुक्तालयात दहीहांडीची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
यंदा पोलीस आयुक्तालयात दहीहांडी आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाची धुम दिसणार आहे. त्यानुसार १४३१ ठिकाणी दहीहांडी बांधली जाणार असून त्यातील दही गोंविदा चोरणार आहेत. याशिवाय १३३ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि ८८ ठिकाणी पथक मिरवणुक निघणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पोलीस आयुक्तालयात मानाच्या हंडींची संख्या देखील वाढल्याचे दिसत आहे. त्यानुसार पाच परिमंडळात १४ मानाच्या हंड्या असणार आहेत. त्यातील ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील विविध मंत्र्यांची रेलचेल या हंडींच्या निमित्ताने दिसून येणार आहे.
परिमंडळाचे नाव - सार्वजनिक - खाजगी - श्रीकृष्ण जन्मोत्सव - पथक मिरवणूक
परि.१ ठाणे - ४६ - २७२ -१८ -१३परि. २ भिवंडी - ४९ - २१५ - २९ - २१परि. ३ कल्याण - ५६ - २६८ - ४१ - १५परि. ४ उल्हासनगर - ५० - १८२ - १५ - १६परि.५ वागळे इस्टेट - ४७ - २१० - ३० - २३एकूण - २८४ - ११४७ - १३३ - ८८मानाच्या दहीहांडी
परिमंडळाचे नावपरि.१ ठाणे - ०३परि. २ भिवंडी - ०४परि. ३ कल्याण - ०१परि. ४ उल्हासनगर - ००परि.५ वागळे इस्टेट - ०६एकूण - १४