कल्याण: काही वर्षापुर्वी महासभेत मंजूरी दिलेले महापुरूषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळयांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई जोशी यांच्यासह दोन ठिकाणी उभारण्यात येणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे फेरप्रस्ताव प्रशासनाला सादर करावे लागले. पुन्हा नव्याने मंजुरी घेतली असलीतरी हे पुतळे उभारणीचे काम तत्परतेने पुर्णत्वाला येईल का? याबाबत मात्र साशंकता आहे.केडीएमसीच्या रूक्मीणीबाई रूग्णालयात उभारण्यात येणा-या डॉ आनंदीबाई जोशींचा अर्धाकृती आणि महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आणि कल्याण पुर्वेकडील ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणा-या पुर्णाकृती पुतळयाचे काम प्रस्तावित आहे. डोंबिवलीत उभारण्यात येणा-या पुतळयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा साकारणा-या शिल्पकराकडूनच डोंबिवलीचे काम पुर्ण झाल्यावर कल्याण ड प्रभागातील पुतळयाचे काम सुरू केले जाणार आहे. २०१६ मध्ये भुमिपूजन झालेल्या डॉ आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकाचे काम मात्र पुर्ण झालेले नाही. दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन अध्यादेशानुसार पुतळा उभारणीचे ठराव आणि हरकत प्रमाणपत्र १ वर्षापेक्षा अधिक जुनी असू नयेत अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या महासभेत प्रशासनाकडून नव्याने पुतळयांचे फेरप्रस्ताव सादर करण्यात आले होते. यावेळी त्या प्रस्तावांना मान्यता मिळाली परंतू काही त्रुटींवर देखील नगरसेवकांकडून बोट ठेवण्यात आले.--------------------------------------------------------------------यंदाही सन्मान नाही----------------------------------येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनी डॉ आनंदीबाई जोशी यांचा पुतळा बसवून त्यांचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा होती परंतू कल्याण शहराला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणा-या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या बाबतीत प्रशासनाची असलेली उदासिनता जैसे थे राहीली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्याणच्या रहिवाशी असलेल्या आनंदीबार्इंनी ११ मार्च १८८६ ला एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली. या त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी आनंदीबार्इंचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली. २००५ मध्ये यासंदर्भातला ठराव मंजूर करण्यात आला खरा पण या कामाच्या भुमिपूजनासाठी २०१६ चा मुहुर्त प्रशासनाला गावला. पण आजतागायत रूक्मीणीबाई रूग्णालयात पुतळा बसविण्यात आलेला नाही. प्रशासनाची उदासिनता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पुतळा उभारणीच्या कामाला उशीर होत असल्याची टिका काकडे यांनी केली आहे तर लवकरात लवकर पुतळा बसविला जाईल असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला आहे.----------------------------------------------------------------------छत्रपतींचा विसर का पडला?------------------------------ड प्रभागात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे पण यासंदर्भात झालेल्या ठरावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मग छत्रपतींचा विसर कसा काय पडला? असा सवाल महासभेत शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे यांनी उपस्थित केला. ठरावाप्रमाणे दोन्ही महापुरूषांचे पुतळे उभारणे गरजेचे असून जर निधी कमी पडला तर आम्ही नगरसेवक तो देऊ, आवश्यक वाटल्यास आमदार जगन्नाथ शिंदे यांचा आमदार निधीही याकामासाठी उपलब्ध करून देऊ असे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी माजी नगरसेवक उदय रसाळ, सचिन पोटे यांनी मांडलेल्या शक्ती भक्ती स्मारकासंदर्भात केलेल्या प्रस्तावाची आठवण करून दिली. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास एकमताने मान्यता देण्यात आली.-------------------------------------------------------------------सत्ताधा-यांची अनास्था---------------------यासंदर्भात विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार केले जाणारे ठराव पाहता याला प्रशासन आणि सत्ताधा-यांची अनास्था कारणीभूत असल्याचे म्हंटले. महापुरूषांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची स्मारक उभी करणे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी चांगल्याच गोष्टी आहेत. सत्ताधारी श्रेय लाटण्यासाठी भुमिपूजनाचे घाट घालतात मात्र ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ज्या काही परवानग्या ठराविक मुदतीत घ्याव्या लागतात त्या घेतल्या जात नाहीत परिणामी असे ठराव पुन्हा पुन्हा मंजुर करण्याची नामुष्की येते त्याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.-------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुन्हा सादर करावे लागले ‘ते ’ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:42 PM
कल्याण: काही वर्षापुर्वी महासभेत मंजूरी दिलेले महापुरूषांचे पुतळे उभारण्यास दिरंगाई होत असताना सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे प्रस्तावित पुतळयांच्या प्रस्तावांना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई जोशी यांच्यासह दोन ठिकाणी उभारण्यात येणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे फेरप्रस्ताव प्रशासनाला सादर करावे लागले. पुन्हा नव्याने मंजुरी घेतली असलीतरी हे पुतळे उभारणीचे काम तत्परतेने पुर्णत्वाला येईल का? याबाबत मात्र साशंकता आहे.
ठळक मुद्देसरकारच्या अध्यादेशामुळे पुतळयांचे फेरठराव