शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

सरकारी योजनांसाठी ‘त्यांना’ गाठावे लागते ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 1:54 AM

सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात.

मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू असल्याने या योजनेच्या सुविधाही येथेच उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.  सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वार्षिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटस्फोटित, विधवा यांना महिना ६०० रुपये मदत केली जाते. या योजनेचे कार्यालय ठाणे तहसीलदार यांच्या अंतर्गत असल्याने मीरा-भाईंदरमधील गरजू महिलांना या योजनेसाठी ठाण्याला जावे लागते. मीरा- भाईंदरमधून ठाण्याला जाणे म्हणजे खर्चिक तर आहेच, शिवाय वाहतूककोंडी पाहता गरजू महिलांना ठाण्याला खेपा मारणे परवडत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या महिलांना ठाण्याच्या खेपा मारणे जिकिरीचे झाले आहे.  मीरा-भाईंदरची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता भाईंदरच्या मॅक्सस मॉलमागील पालिका इमारतीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाले आहे. परंतु, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना या ठाणे तहसीलदार यांच्या कार्यालयातूनच राबवल्या जातात. त्यामुळे ही योजना येथून राबवावी. ‘कार्यालय सुरू करा’ मीरा रोड प्रभाग समिती सभापती हेतल परमार यांनी नुकतेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह तहसीलदार ठाणे, अपर तहसीलदार मीरा-भाईंदर, महापौर आणि आयुक्तांना निवेदन देऊन भाईंदर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर