शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

चोर सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद, तरीही गुन्हा दाखल नाही, पोलिसांनी घेतला केवळ तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 5:54 AM

शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणाºयाचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्हा दाखल करू, असा अजब सल्लाच तक्रारकर्त्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणाºयाचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्हा दाखल करू, असा अजब सल्लाच तक्रारकर्त्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.साधारणपणे सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणाची यापूर्वी म्हणजे तीन ते चार वर्षांपूर्वी केवळ चोरीची तक्रार दाखल केली जात होती. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी जबरी चोरीच्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला जातो. आरोपीला लवकर जामीन मिळू नये आणि त्याला कायद्याची जरब बसावी, हा त्यामागचा हेतू आहे. मध्यंतरी ठाण्यात तर सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कान्वये पोलीस आयुक्त परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मणेरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घटही झाली. असे असताना शिवाईनगर भागातील ‘जिजामाता’ या इमारतीमध्ये राहणाºया सुमित्रा या १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता फेरफटका मारून घरी परतल्या, तेव्हा एका २० ते २५ वयोगटांतील तरुणाने त्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी वळल्या असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची (४५ हजार रुपये) सोनसाखळी हिसकावून पलायन केले. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्या इमारतीबाहेर दुचाकीवर असलेल्या दुसºया एका भामट्याबरोबर सोनसाखळी खेचणाराही पळून गेला. प्रचंड घाबरल्यामुळे सुमित्रा यांनी दुसºया दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी दीपक या आपल्या वकील मुलासमवेत जाऊन वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनसाखळी हिसकावणारा स्पष्ट दिसतो, ते फुटेजही अ‍ॅड. राणे यांनी पोलिसांना दाखवले. तरीही, त्यांना तीनचार दिवस थांबा, नंतर गुन्हा दाखल करू, असा अजब सल्ला देण्यात आला. त्याऐवजी त्यांच्याकडून केवळ तक्रार अर्ज घेण्यात आला. एखाद्या वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान, शिवाईनगरातील याच इमारतीमधील कदम या अन्य एका व्यक्तीचीही सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी घडला होता. सोनसाखळी जबरी चोरीच्या या वाढत्या घटनांची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी येथील रहिवासी जितेंद्र शिंदे यांनी केली आहे.या महिलेने गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रह धरणे अपेक्षित होते. यात नेमकी चूक कोणाची आहे, ते पडताळले जाईल. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल.- महादेव भोर, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणेप्राथमिक चौकशी सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.- प्रदीप गिरधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे

टॅग्स :Crimeगुन्हा