लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळव्यातील पारसिकनगर भागातील दोन वेगवेगळया घरांमध्ये शिरुन चोरटयांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारसिकनगरातील एव्हरग्रीन हाईटस्मधील ए-५०१ या सदनिकेतील रहिवाशी अभिषेक बक्षी (३२) यांच्या घराच्या बेडरुमची स्लायडींगची खिडकी उघडून अज्ञात चोरटयांनी २७ सप्टेंबर रोजी रात्री ११.५० ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिरकाव केला. या घरातून चोरटयांनी अनुक्रमे ४० हजार, ३० हजार आणि ३५ हजारांचा असे तीन लॅपटॉप, अनुक्रमे ७० हजार आणि ६० हजारांचे दोन मोबाइल फोन आणि २० हजारांची सहा घड्याळे असा दोन लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. तर एव्हरग्रीन हाईटसमधील हेमंत पवार यांच्या ए ३०१ क्रमांकाच्या घरातून ४० हजारांच्या लॅपटॉपसह ९२ हजारांच्या ऐवजाची चोरी केली. एकाच इमारतीमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळया घरांमध्ये चोरटयांनी लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, याप्रकरणी अभिषेक बक्षी यांनी २८ सप्टेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर गोंटे हे अधिक तपास करीत आहेत.
कळव्यात स्लायडींगच्या खिडकीतून चोरटयांचा शिरकाव: साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:06 AM
पारसिकनगर भागातील दोन वेगवेगळया घरांमध्ये स्लायडींगच्या खिडकीतून शिरुन चोरटयांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्दे पारसिकनगरातील घटना कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा