- सुरेश लोखंडेठाणे : नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. या बदल्यांची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत तयार होणार आहे.ठाणे-पालघर जिल्हा परिषदांच्या सीईओंची कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होईल. त्यामध्ये या बदल्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचारी पदे समसमान ठेवण्यासाठी कर्मचाºयांचे समायोजन केले जात आहे. प्रत्येक विभागातील संवर्ग व प्रवर्गनिहाय या शेकडो बदल्या होणार आहेत. यात सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाºयांनादेखील पालघर जिल्हा परिषदेत जावेच लागणार आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाºयांचादेखील बदल्यांमध्ये समावेश आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व ३१ जुलै २०१७ च्या जीआरनुसार या बदल्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी नेत्यांनी जंगजंग पछाडल्यानंतरही बदल्या अटळ असल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.ठाणे व पालघर जिल्हा परिषदांकडून होणाºया या बदल्यांसाठी सेवाज्येष्ठता, प्रवर्ग, बिंदूनामावली, विकल्प आधारित, प्राधान्यक्रम आणि दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये समसमान पदे आदी निकषांचा समावेश आहे.
ठिय्याबाजांना पालघरला जावेच लागणार; ठाण्यातून जाण्यास कर्मचाºयांचा विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:56 AM