ठाणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी लागवड करण्यात येणा-या पीकाचे संगोपन, निगा राखण्यासाठी शुक्रवारी जिल्हा कृषी अधिक्षेक कार्यालयाने कृषीतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली. त्यात शेती शाळेचे धडे देऊन शेतीचे उत्पादन अधिक वाढवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक अंकूश माने यांनी लोकमतला सांगितले.खरीप हंगामास अनुसरून कृषी विभागाची सध्या जैय्यत तयारी सुरू आहे. त्यानुसार शेती शाळेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन नियोजनाची तयारी कृृषी विभागाकडून सुरू आहे. जिल्हह्यात ठिकठिकाणी आयोजित होणाऱ्यां शेती शाळांमध्ये एका वेळी सुमारे २० ते २५ पीक उत्पादनक शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. ही शेतीशाळा प्रत्यक्ष शेतावर होणार आहे. यामध्ये शेतीचे निरिक्षण, संशोधने आदी संपूर्ण प्रशिक्षण प्रात्यक्षिक शेतावर केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या शेती शाळेचा अभ्यास क्रमही स्थानिक गरजांवर आधारीत करण्याचे निश्चित केले. या शेती शाळेच्या कालावधीत आठ प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.शेती शाळेसाठी शेत निवडनाचे निकष, शेती शाळेचे आयोजन करताना घ्यावयाची काळजी, शेती शाळा म्हणजे काय, या शाळेचा उद्देश, शाळेची कार्यपध्दती, अभ्यासक्रम, या शाळेच्या प्रशिक्षणार्थींची निवड,गाव निवड,या शेतीशाळेचे पिकनिहाय टप्पे, १५ दिवसात एक वर्ग घेण्याचे नियोजन केले जाईल. या शेती शाळेच्या पूर्व तयारीसाठी बुधवारी ८ मेला मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर तालुक्यात ९ मेला आणि १०मेला शहापूर तालुक्यात या शेती शाळेच्या कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहे.यामध्ये शेतकऱ्यांसह कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आदींचा समावेश राहणार आहे.
शेतीतील अधिक उत्पादनासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी ठाणे अधिकाऱ्यांना शेती शाळेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 7:19 PM
खरीप हंगामास अनुसरून कृषी विभागाची सध्या जैय्यत तयारी सुरू आहे. त्यानुसार शेती शाळेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन नियोजनाची तयारी कृृषी विभागाकडून सुरू आहे. जिल्हह्यात ठिकठिकाणी आयोजित होणाऱ्यां शेती शाळांमध्ये एका वेळी सुमारे २० ते २५ पीक उत्पादनक शेतकऱ्यांचा समावेश
ठळक मुद्देखरीप हंगामास अनुसरून कृषी विभागाची सध्या जैय्यत तयारी शेती शाळेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन कार्यशाळाशेतीचे निरिक्षण, संशोधने आदी संपूर्ण प्रशिक्षण प्रात्यक्षिक शेतावर