ठाणे : कोल्हापूर महानगरपालिका आयोजित व जिल्हा जलतरण संघटना संचलित नुकत्याच अंबाई जलतरण तलाव येथे महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करीत १४ सुवर्ण, ४ रजत, २ कांस्य पदके पटकाविली. रंकाळा तलाव संवर्धन जलतरण स्पर्धेत स्टारिफश स्पोर्टस अॅकॅडमीचे सानिका तापकीर व जय एकबोटे यांनी चौथा क्र मांक पटकाविला तर वेदांत गोखले या जलतरणपटूचा ’यंगेस्ट स्वीमर’ म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. अंबाई जलतरण तलाव येथे फ्री स्टाईल, बॉक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय या विविध जलतरण प्रकारात झालेल्या स्पर्धेत सवर अकुसकर हिने सहा सुवर्णपदकांसह स्पर्धेची चॉम्पियनशीप पटकाविली तर आदित्य घाग याने चार सुवर्ण व दोन रजत पदकांसह चॅम्पियनशीप पटकाविली. तसेच, ऋग्वेद पाटील याने एक सुवर्ण व एक कांस्यपदक, नील वैद्य याने एक रजत एक कांस्यपदक तर रियान नरोटे याने एक कांस्यपदक पटकाविले. ठाणे महानगरपालिकेचे प्रशिक्षक व अॅकॅडमीचे मार्गदर्शक कैलास आखाडे यांनी तीन सुवर्णपदकांसह एक रजतपदक पटकाविले.तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सवर अकुसकर, आदित्य घाग व कैलास आखाडे यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आ. सतेज पाटील, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी जलतरणपटूंवर ठाणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारिफशच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:19 PM
ठाण्यातील क्रीडा क्षेत्रात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी सुवर्ण, रजत, कांस्य अशा एकूण २० पदकांची लयलुट केली आहे.
ठळक मुद्देमहापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न जलतरणपटूंनी केली २० पदकांची लयलूट वेदांत गोखलेचा ’यंगेस्ट स्वीमर’ म्हणून विशेष सत्कार