ठाणे : या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना-नवरात्रार॔ंभ असून, १२ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र संपन्न होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे. ९ ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन आहे. १० ऑक्टोबर रोजी रात्री महालक्ष्मी पूजन आहे. त्याच दिवशी सरस्वती पूजन आहे.
या वर्षी महाष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी ११ ऑक्टोबर रोजी करावयाचे आहेत. त्या दिवशी सकाळी ११.४२ ते दुपारी १२. ३० संधीकाल पूजा आहे.
विजया दशमी-दसरा १२ ऑक्टोबर रोजी आहे. त्याच दिवशी सरस्वती विसर्जन आणि नवरात्रोत्थापन असल्याचे सोमण यांनी सांगितले.
पुढील १० वर्षांतील घटस्थापनेचे दिवस सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ गुरुवार, ३० सप्टेंबर २०२७ मंगळवार, १९ सप्टेंबर २०२८ सोमवार, ८ ऑक्टोबर २०२९ शनिवार, २८ सप्टेंबर २०३० शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०३१ मंगळवार, ५ ऑक्टोबर २०३२ शनिवार, २४ सप्टेंबर २०३३ शनिवार, १३ ऑक्टोबर २०३४