शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
2
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
3
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
4
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
5
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
6
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
7
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
8
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
9
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
10
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
11
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
12
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
13
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
14
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
15
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
16
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
17
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
18
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
19
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO
20
मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

आॅफ लााईन धान्य वितरण होणाऱ्या शिधावाटप दुकानांची कसून तपासणी; भिवंडीतील २० दुकानांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:21 PM

जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई पॉस यंत्रे देऊन त्यां दुकानदारांना प्रशिक्षित ही करण्यात आले. यामुळे या ईपॉस यंत्राव्दारे ग्राहकाना देखील धान्याची उचल केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी सांगितले. मात्र २५ टक्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता २० दुकानामध्ये केल्याचे आढळून आले. यास आळा घालण्यासाठी त्यातील ग्राहकांची काटेकोर व्यापक तपासणी

ठळक मुद्देआॅफ लाईन धान्य घेणा-या व्यक्तींची राज्यव्यापी सर्व्हेक्षण मोहीमई पॉसचा वापर न करता भिवंडीतील २० दुकानांमध्ये धान्य वितरणकमीतकमी २० ग्राहकाना व्यक्तिश: बोलावून त्याना देखील विचारणा

ठाणे : शिधावाटपाचे काम संगणकीकृत झाले आहे, मात्र अद्यापही आॅफ लाईन म्हणजे ई पॉस यंत्राशिवाय धान्याचे वितरण सुरू आहे. सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता भिवंडीतील २० दुकानांमध्ये धान्य वितरण झाल्याचे आढळून आले. यामुळे या दुकानांची १८ व १९ सप्टेंबर रोजी कडक तापासणी होणार आहे.

या आॅफ लाईन धान्य घेणा-या व्यक्तींची राज्यव्यापी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील २० शिधावाटप दुकानांची देखील सलग दोन दिवस तपासणी केली जाईल. जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई पॉस यंत्रे देऊन त्यां दुकानदारांना प्रशिक्षित ही करण्यात आले. यामुळे या ईपॉस यंत्राव्दारे ग्राहकाना देखील धान्याची उचल केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी सांगितले. मात्र २५ टक्यांपेक्षा जास्त धान्याची उचल ई पॉसचा वापर न करता २० दुकानामध्ये केल्याचे आढळून आले. यास आळा घालण्यासाठी त्यातील ग्राहकांची काटेकोर व्यापक तपासणी करण्यात येणार असल्याचे वळवी यांनी सांगितले.या तपासणीमध्ये धान्य ई पॉसच्या माध्यमातून का देण्यात आले नाही, त्याचा अहवाल तयार करण्यात येणारा आहे. जेणेकरून यामागील कारण कळेल व ती समस्या दूर करणे शक्य होईल. यानंतरच १०० टक्के आॅनलाईन व्यवहार शिधावाटप दुकानांवर करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधीत २० दुकानांचे सर्वेक्षण करून तपासणी हाती घेतली आहे. ही तपासणी आॅगस्ट महिन्यात झालेल्या धान्याच्या विक्रीवर आधारित होईल. यासाठी भिवंडी तहसीलदार, नायब तहसीलदार , पुरवठा निरीक्षक आदी जबाबदार अधिकाºयांचे पथक १८ सप्टेंबरला दोन आणि १९ ला दोन अशा चार दुकानांना भेटी देऊन ते सर्व व्यवहार तपासणी करणार आहे. यासाठी त्याना शासनाने विवरणपत्र दिले असून त्यात विविध कारणेही नमूद केलेली आहेत. त्यानुसार तपासण करण्यात येईल.पथकाव्दारे पहिल्या दिवशी भिवंडी तालुक्यातील खोणी एक, खोणी दोन, काटई दोन, खोणी पाच, पडघा एक, पडघा दोन, कुशिवली, लाप, भवाळे, देवळी या रास्त भाव शिधावाटप दुकानांची तपासणी करण्यात येईल . यानंतर दुसºया दिवशी खोणी तीन , खोणी चार , आवळे, पिळझे खु, धामणगाव दोन , भोईरगाव, लोनाड, नांदकर, कशिवली, नेवाडे येथील शिधावाटप रास्तभाव दुकानांची तपासणी येईल. या निश्चित केलेल्या दुकानांतील कमीतकमी २० ग्राहकाना व्यक्तिश: बोलावून त्याना देखील विचारणा करून बोलते करण्यात येणार आहे. ई पॉस मशीनमध्ये नाव नसणे, दुकानांमध्ये नेटवर्क नसणे, आधार सीडिंग न होणे, सर्व्हरला माहिती अद्ययावत न होणे, संबंधित तहसील कार्यालयाकडून योग्य ते सहकार्य न मिळणे अशी काही कारणे देखील यावेळी तपासण्यात येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी