शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘त्या’ ५३० कासवांना वनखात्याचा आठ दिवस पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:12 AM

तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेले सुमारे ५३० कासव येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथे हस्तगत केले.

ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेले सुमारे ५३० कासव येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथे हस्तगत केले. शनिवारी ठाणे न्यायालयाने ते सोडण्याची परवानगी दिली. यानुसार, या कासवांचा निवास असलेल्या कर्नाटक न्यायालयाकडून तशी परवानगी घेऊनच त्यांना तेथे सोडावे लागेल. तोपर्यंत या कासवांना येथील वनखात्याचा सुमारे आठ दिवस तरी पाहुणचार घ्यावा लागणार आहे.या कासवांची तस्करीकरूनरेल्वेने कुर्ला येथे आणलेल्या शोपी (३४) या महिलेलादेखील न्यायालयासमोर हजार केले असता तिला पाच दिवसांची वनविभागाची कस्टडी मिळाल्याचे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले. कर्नाटक -आंध्र प्रदेशातून कासवांची ही ५३० पिले गुरुवारी रेल्वेद्वारे कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनअधिकाऱ्यांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचून या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडल्याचे कंक यांनी स्पष्ट केले.मुंबईतील एका पार्टीने या कासवांची आॅर्डर दिल्याचे पकडलेल्या या शोपीकडून सांगितले जात आहे. त्याच्या सांगण्यानुसार कासवांची ही तस्करी करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांची मागणी करणाºयापर्यंत ही शोपी घेऊन जाईल, अशी वनअधिकाºयांची अपेक्षा आहे. त्यासाठी तिच्याशी सुसंवाद साधून या तस्करीचे राज उलगडण्याचा प्रयत्न वनअधिकाºयांकडून सुरू आहे. वनखात्याच्या कस्टडीतील या महिलेकडून अन्यही काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तिला बोलते करण्याचा प्रयत्न सुरू आहे.तस्करीच्या नावाखाली पकडलेल्या या कासवांचे मेडिकल करण्यात येत आहे. त्यांना पोषक खाद्यही दिले जात आहे. या कासवांना येथील हवामान मानवणार नाही. त्यांचा अधिवास कर्नाटक, आंध्रमधील आहे. यामुळे त्यांना तेथील जंगलात सोडावे लागेल. यासाठी आपल्या न्यायालयाने शनिवारी परवानगी दिली. याप्रमाणे आता कर्नाटक न्यायालयाची परवानगी घेऊन कर्नाटक वनअधिकाºयांच्या साहाय्याने तेथील जंगलात, तलावांत त्यांना सोडावे लागेल. त्यासाठी आपले खास पथक पाठवावे लागेल. तोपर्यंत या कासवांच्या पिलांची रोज निगा राखून त्यांचे मेडिकलही करावे लागणार असल्याचे कंक यांच्याकडून सांगण्यात आले.