शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

‘त्या’ चिमुरड्यांवर पंधरा दिवसांत वारंवार बलात्कार, सरकारी समितीचा प्राथमिक निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 5:50 AM

शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.

बदलापूर : बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसांत अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाले असावे, आरोपी अक्षय शिंदे यांची पार्श्वभूमी तपासल्याखेरीज त्याला नियुक्त केले, मुलींवरील अत्याचाराची तक्रार आल्यावरही संस्थेचे विश्वस्त ४८ तास स्वस्थ बसून राहिले, असे धक्कादायक निष्कर्ष राज्याने नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय समितीने सरकारला सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात काढण्यात आले. 

अहवालात नेमके काय?- त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.- गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.- १ ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.- त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता.- त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे. - हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.- शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.- तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.- पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला १२ तास लागले.- या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की ‘मुली दोन तास सायकल चालवतात का?’ यावरून अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी