ठाणे : ठाणे शहरात गुरु वारी तब्बल ६४ कोरोना पॉझीटीव्ह रु ग्ण सापडले असून एकट्या लोकमान्य- सावरकर प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये विविध परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांमधून गुरु वारी ३५ नागरीकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. लोकमान्य नगरमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मृताच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या ७२ जणांना पालिकेच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र लोकमान्य नगरचच्या केस मध्ये क्वॉरान्टाइन झालेल्यांपैकी ६८ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दिली आहे. त्यामुळे लोकमान्य सोडून या प्रभाग समितीच्या हद्दीतील विशेष करून काजूवडी आणि इतर परिसरातील हे रु ग्ण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचा आकडा वाढतच असून गुरवारी एकट्या लोकमान्य- सावरकर प्रभाग समितीमध्ये तब्बल ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. यातील ७ ते ८ नवे रु ग्ण वगळता इतर सर्व पॉझिटिव्ह रु ग्ण हे क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकीच असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीच्या हद्दीत केवळ लोकमान्य हा एकमेव परिसर येत नसून या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये काजूवाडी, विजय नगर, रामचंद्र नगर, संभाजी नगर, असे परिसर येत असून गुरु वारी जे पॉझिटिव्ह रु ग्ण सापडले आहे ते या भागातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकी आहे.अंतयात्रेतील ६८ जण निगेटिव्ह -काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या मृताच्या अंतयात्रेत सहभागी झालेल्या ७२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र यातील ६८ जनांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असल्याने जरी या प्रभाग समितीमध्ये ३५ जण पॉझिटिव्ह आले असले तरी, हे रु ग्ण लोकमान्य नगर मधील नसून या प्रभाग समितीमधील इतर परिसरातील आहे.दीड महिन्यांपासून सहाय्यक आयुक्त रजेवर -कोरोना सारख्या गंभीर संसर्गाशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असताना लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीला मात्र दीड मिहन्यांपासून सहाय्यक आयुक्तच नसल्याची माहिती हणमंत जगदाळे यांनी दिली आहे. या संसर्गाशी सामना करण्यासाठी प्रभाग समिती निहाय एका समतिीचे गठन करणे गरजेचे असून यामध्ये लोकप्रतिनीची मदत घेणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.
ते रुग्ण लोकमान्य नगर भागातील नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 4:50 PM