मीरा रोड : मीरा रोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. मीरा रोडच्या हाटकेश, सालसर गार्डन येथील उज्ज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवरखाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतला. काशीमीरा पोलिसांनी प्रभाग समिती क्रमांक चारला २५ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून, या मंडळाने अर्ज केला असला तरी अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या खाली मंडप उभारण्यास मंडळास मज्जाव करावा, अन्य जागी मंडप उभारण्यासाठी आवाहनाचे पत्र दिले.
तणाव निर्माण झाला दुबेसह आणखी एका वयस्कर व्यक्तीने पालिकेवर पैसे खाण्याचे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही, एका क्लबवाल्याकडून पैसे खाऊन कारवाई करतात, आदी स्वरूपाचे आरोप केले. यामुळे परिसरात गर्दी जमून तणावाचे वातावरण निर्माण झाले. पालिकेचे कर्मचारी महेंद्र गावंड यांच्या फिर्यादीवरून आकाश दुबेवर सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
वेळीच कारवाईची गरज महापालिकेसह वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची परवानगी आल्याशिवाय मंडप उभारण्याचे काम करता येत नाही. मात्र, बेकायदा मंडप उभारण्याचे काम आधीच सुरू केले जात आहे. त्यामुळे महापालिका पथक आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यास असे तणावाचे प्रसंग टाळता येऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.
पोलिसांच्या पत्राला केराची टोपलीपोलिसांच्या पत्रानंतर प्रभाग समिती क्रमांक ४ चे पालिका पथक हे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांसह शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी मंडपाच्या ठिकाणी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडप काढण्यास सांगत होते. त्यावेळी आकाश गोपाळ दुबे (रा. एस्टर, सैलसर गार्डन) याने पालिका पथकास धक्काबुक्की केली.