डोंबिवली : शहरातील बहुचर्चित विक्र ांत उर्फबाळू केणे हत्याकांडातील इंदुमती चौधरी आणि संगीता भगत या महिला आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक झाली आहे.पूर्वेतील आयरे गावातील विक्र ांत याची ३० मे रोजी त्याच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी मंगेश भगत, श्रीराम भगत, ओंकार भगत, शुभम भगत, पंकज म्हात्रे, प्रदीप नायडू, संजय तुळवे, प्रशांत पवार, शशिकांत उर्फशांताराम कुळे, लाडू उर्फ सुमित व त्याचा भाऊ स्वप्नील चौधरी अशा ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आहेत.मात्र, या हत्याप्रकरणातील महिला आरोपी आणि घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असलेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या इंदुमती काशिनाथ चौधरी आणि संगीता श्रीराम भगत यांनी अटक टाळण्यासाठी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सोमवारी त्यावर सुनावणी झाली. याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संगीता फड आणि अॅड. प्रदीप बावस्कर यांनी नेमणूक झाली आहे. जिल्हा सत्र न्यायधीश न्या. एस. पी. गोगरकर यांनी या दोन्ही महिला आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याची माहिती अॅड. बावस्कर यांनी दिली.
‘त्या’ महिलांना अटकपूर्व जामीन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:11 AM