शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी रक्षाबंधन बिनधास्त साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:28 AM

श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सामान्यपणे ग्रहणकाळ वाईट समजत असले तरी या काळात रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण साजरे करण्यात काहीच अनिष्ट...

ठाणे : श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सामान्यपणे ग्रहणकाळ वाईट समजत असले तरी या काळात रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण साजरे करण्यात काहीच अनिष्ट नसल्याचे पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. हे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी (मुंबई) चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशीत दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होणार असून रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत आल्यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल. हे चंद्रग्रहण आपणास साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे दुर्बिण किंवा द्विनेत्री असेल त्यांनी त्यातून चंद्रग्रहण निरीक्षण करण्यास हरकत नाही असे ते म्हणाले. हे चंद्रग्रहण सॅरॉस चक्र ११९ क्र मांकातील आहे. यादिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ९४ हजार ७७० किलोमीटर अंतरावर असेल. यंदा श्रावण अमावास्येला (२१ आॅगस्ट) खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु, ते ग्रहण भारतातून दिसणार नाही. ते हवाई, उत्तर पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, युरोपचा अतिपश्चिमेकडील भाग आणि पश्चिम आफ्रिका येथून दिसेल. अमेरिकेच्या मोठ्या भागातून या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार असल्याने ते मनोहारी दृश्य पाहायला अनेक खगोलप्रेमी अमेरिकेला जाणार आहेत. पुढच्या वर्षी बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही ते म्हणाले.