कल्याण: कल्याणच्या आंबिवली वडवली परिसरात असलेल्या एनपीएल कंपनीने निर्जंतूकीकरणासाठी एक हजार लिटर हायड्रोजन पॅराक्साईड देण्याचे मान्य केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेस हे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या हायड्रोजन पॅराक्साईडच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील विविध ठिकाणो निर्जंतूकीकरण करण्यात येणार आहेत. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी देश एकवटला असता एनपीएल कंपनीने आरोग्यविषयीची त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवून लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपला सहभाग दर्शविला आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी माहिती दिली की, वडवली येथे एनपीएल नावाची कंपनी आहे. या कंपनीत हायड्रोजन पॅराक्साईड नावाचे रसायन तयार केले जाते. त्याचा वैद्यकीय क्षेत्रत मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जातो. या रसायानाची फवारणी केल्यास निर्जंतूकीकरण होते. या कंपनीचे अधिकारी बासरे यांच्या परिसरात राहतात. त्यांच्याशी त्यांचे बोलणो झाले. बासरे यांनी तात्काळ महापालिका सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. सचिवांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याश्ी संपर्क साधला. यासंदर्भात माजी महपौर राजेंद्र देवळेकर यांचेही बोलणो झाले होते. कंपनी हायड्रोजन पॅराक्साईड पुरविण्याची तयारी दर्शविल्याने शहरातील रुग्णालये, महत्वाची ठिकाणो निर्जंतूकीकरण करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीतील राष्टरवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भातील एक व्हीडीओ क्लीप सोशल मीडियावर पाठवली आहे. वाडिया कंपनीही हायड्रोजन पॅराक्साईड द्रव्याचे उत्पादन करणोत त्याठिकाणाचे अधिकारी हासीफ डांगी यांनीही निर्जंतूकीकरणासाठी या द्रव्याचा पुरावा करण्याचे मान्य केले आहे. तोच आदर्श वडवलीच्या एनपीएल कंपनीने दाखवित माणूकीचे दर्शन घडविले आहे.