ठाणे: सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्र म) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार आणि सोमवारच्या दोन दिवसांमध्ये तब्बल दहा हजार ठाणेकरांनी या शिबिराचा लाभ घेतला. सुमारे दोन कोटीं रुपयांची औषधे गरजूंना विनामूल्य देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.किसन नगर-२ येथील नेपच्यून एलिमेंट , रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट या ठिकाणी २९ एप्रिल ते १ मे अशा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, परिवहन सभापती अनिल भोर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे चाप्टरचे अध्यक्ष दिनकर देसाई, वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. भोर आदी उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या शिबीराचा समारोप १ मे रोजी होणार आहे.तब्बल ३५० हून अधिक डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी असे सुमारे ७०० जणांचे पथक याठिकाणी तैनात केले आहे. सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी याठिकाणी करण्यात येत आहे. गरजूंवर मोफत किंवा सवलतीच्या दरात नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रीया देखिल करण्यात येणार आहे. नेत्ररोग,
ठाण्यात शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचा दहा हजार गरजूंनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:06 PM
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराचा दहा हजार गरजूंनी लाभ घेतला. यावेळी सुमारे दोन कोटीं रुपयांची औषधे गरजूंना विनामूल्य देण्यात येत आहे.
ठळक मुद्दे७०० हून अधिक जणांचे वैद्यकीय पथक तैनातदोन कोटीं रुपयांच्या औषधांचेही विनामूल्य वाटपवैद्यकीय मदत कक्षामुळे गरजूंना मिळाली तीन कोटींची मदत