ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने १० ते २४ जानेवारी दरम्यान २७ व्या ‘रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले असून त्यांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. यावेळी ठाणे पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी ठाण्यात वातुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून वर्षभरात सुमारे आठ कोटींचा दंड वसूल होत असल्याचे उघड केले. भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण फार मोठया प्रमाणावर असून भारत हा तरु णांचा देश आहे. तेव्हा तरु णांनी अपघात टाळण्यासाठी या रस्ता सुरक्षा अभियानातील विविध कार्यक्र मातून बोध घेण्याचे आवाहन शिंदे यांनी युवा-युवतींना केले. महिलांना पुरु षा बरोबरच रिक्षा चालविण्याचा परवाना कसा मिळेल आणि त्या आर्थिक दृट्या कशा सक्षम होतील,या बाबत लवकरच परिवहन मंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्र मास आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, सिने अभिनेता अर्जुन कपूर, सिने अभिनेत्री कंगणा राणावत आदींचे यावेळी भाषणे झाली. यावेळी परिवहन अधिकारी विकास पांडकर, संजय डोळे, हेमांगिनी पाटील आदीं उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून ठाण्यात वर्षाला कोटींची दंडवसुली
By admin | Published: January 11, 2016 1:53 AM