शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:50 AM

चार लाख ४७ हजार ५३० मतदारांचा समावेश : ४३० मतदानकेंद्रांचा समावेश

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये चार लाख ४७ हजार ५३० मतदार असून त्यापैकी ८८.५७ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. उर्वरित ५१ हजार १५२ अर्थात ११.४३ टक्के मतदारांकडे अद्यापही निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रांचा अभाव आहे. बहुसंख्येने मतदान होण्यासाठी जनजागृती सुरु असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी केले आहे.ओवळा-माजिवडा या १४६ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या मतदारसंघाच्या पोखरण रोड क्रमांक दोन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील कार्यालयात बागल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मतदारसंघातील ४३० मतदानकेंद्रांपैकी ३७७ आणि ३७८ या क्रमांकांची दोन मतदानकेंदे्र महिलांसाठी असणार आहेत. या मतदारसंघांत दोन लाख ४३ हजार ८१५ पुरुष, तर दोन लाख तीन हजार ७०४ महिला तसेच ११ इतर मतदार आहेत. ३१ आॅगस्ट २०१९ च्या अंतिम यादीनुसार या मतदारसंघामध्ये तीन लाख ९२ हजार १७१ फोटो मतदार, तीन लाख ९६ हजार ३७८ इपिक अर्थात ओळखपत्रधारक मतदार आहेत.४३० पैकी ३९१ तळमजल्यावर, तर ९१ पहिल्या मजल्यावर मतदानकेंद्रे आहेत. पहिल्या मजल्यासाठीही लिफ्टची सुविधा आहे. मतदारसंघात एकूण ८०३ दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी व्हीलचेअर तसेच वाहनांचीही सुविधा दिली जाणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव मतदारयादीत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी १९५० या टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधून आपले नाव मतदारयादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन बागल यांनी मतदारांना केले आहे.पोखरण रोडवर होणार मतमोजणीया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पोखरण रोड क्रमांक दोन, ठाणे येथे होणार आहे. याच ठिकाणी ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूमध्ये ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रि या सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी ४७३ अधिकाऱ्यांसह ४७३ पोलीस असे दोन हजार ८३८ कर्मचारी याठिकाणी तैनात राहणार आहेत.१११ अंध मतदारांचा समावेशया मतदारसंघांमध्ये १११ अंध, ७३ कर्णबधिर, इतर २२८ अशा ८०३ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. महिलांसाठी श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, तळमजला, रूम क्रमांक एक हे ३७७ तर त्याचठिकाणी रूम क्रमांक दोन मध्ये ३७८ ही दोन महिलांसाठी मतदानकेंद्रे आहेत.११५ सैनिक मतदारया मतदारसंघामध्ये आतापर्यंत ११५ सैनिक मतदारांच्या नावांची नोंद केली आहे. तर, मागणीनुसार संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकावाटप करण्याचे नियोजनही केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019