ठाणे : जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान आहे. निवडणूक रिंगणातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी सहा हजार ६२१ मतदान केंद्रांवर जिल्ह्यातील ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदानांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी या मतदान केंद्रांवर २९ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या केंद्रांवर मतदारांनी मोठ्याप्रमाणात मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मतदान प्राप्तीसाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांचे नियोजन करून मतदाराना मोठ्याप्रमाणात सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्स्फुर्तपणे मोठ्याप्रमाणात भरघोस मतदान करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे उपस्थित होते. जास्तित जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रि येत सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या महात्सवात सहभागी व्हावे असे आवाहन नार्वेकर यांनी मतदाराना केले आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात पुरु ष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आदी ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार आहेत. यामध्ये पुरु ष ३४ लाख ७९ हजार ५०८ तर २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय, तृतीयपंथी ४६७ मतदार आहेत. जिल्ह्याभरात दहा हजार ४८९ दिव्यांग मतदार असून, सर्व्हिसमधील एक हजार ५३२ मतदार या निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.जिल्ह्यातील १८ मतदारसंघात सहा हजार ६२१ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य मतदान केंद्र सहा हजार ४८८ असून सहायक मतदान केंद्र १३३ आहेत. यामध्ये ५९१ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषीत केली आहेत. निश्चित केलेल्या मतदान केंद्रांमध्ये २३ सखी मतदान केंद्रे’ असून दिव्यांग मतदान केंद्रे ११ आहेत. तर आदर्श मतदान केंद्र नऊ आहेत. मतदान प्रक्रि या सुलभपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सात हजार ९५१ बॅलेट युनिट, नियंत्रण युनिट सात हजार४९५, व्हीव्हीपॅट आठ हजार ३६३ आहेत. या मध्ये राखीव मतदान यंत्रांचा देखील समावेश आहे. या मतदान केंद्रांवर सुमारे २९ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण प्राप्त या कर्मचाºयापैक्ी पुरु ष कर्मचारी १४ हजार ३१४ तर महिला कर्मचारी १३ हजार ५२६ आहेत.--------------* ५८०२ शस्त्रास्त्रे जमा-जिल्ह्याभरातून पोलिस आयुक्तालयातून चार हजार ३२७ शस्त्रे, नवी मुंबईतून ९६२ शस्त्रे आणि पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातून ५१३ शस्त्रे जामा झाली आहे .* आचारसंहिता भंगचे २५ गुन्हे - मालमत्ता विदृपीकरणाचे २१ गुन्हे तर प्रचारासाठी परवानगी न घेता वाहन वापरल्यामुळे चार गुन्हे* ४० लाखांची दारू जप्त - दोन लाख ९८६ लिटर अवैध दारू जप्त केली आहे. त्याची किंमत ४० लाख रूपये आहेत. राज्यात सर्वाधिक दारू ठाणे जिल्ह्यातून जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.* तीन कोटी रूपये जप्त - जिल्ह्याभर ठिकठिकाणी झालेल्या कारवाईत दोन कोटी ९० लाख रूपयांची रक्कम भरारी पथकांनी जप्त केली आहे. यासंबंधीची कारवाई आयकर विभागाकडून सुरू आहे.* १२ हजार पोलीस कर्मचारी -निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. सुमारे हजार पोलीस कर्मचारी व होमगार्ड तसेच १८ केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्यात आली आहेत.* वाहतुकीसाठी २९०४ वाहने -मतदान केंद्रांवर कर्मचारी व साहित्याची ने आण करण्यासाठी दोन हजार ९०४ वाहने जिल्हाभर धावणार आहेत. यामध्ये एक हजार ३२७ बसेस, एक हजार ४४० जीप, २६ टेम्पो ट्रॅव्हलर, ३० ट्रक, ८१ कार, रीक्षा आदी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.* मतदान केंद्रांवरील सोई-सुविधा -किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतिपत्रका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था आहे.* मतदान यंत्रावर ब्रेल लिपी - अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचना फलक, मतदार यादी ब्रेल लिपीमध्ये तयार केली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली आहे. यामुळे आता कोणाच्याही मदतीखेरीज मतदान शक्य आहे .* पाळणा घर -लहान मुलांसह मतदानास येणाºया महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था केली आहे. मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती भारत निवडणूक आयोगाच्य संकेतस्थळावर उपलब्ध आहे.* १९५० हेल्पलाईन-मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-१९५०.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन अॅप’ ही सुरु आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसल्यास मतदाराजवळी सुमारे ११ प्रकारचे ओळखपत्रे निश्चित केले आहेत.* मोबाईल वापरास मनाई - मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी आदींना मोबाईल फोन, कॅमेरा, ईलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट यांच्या वापर करण्यास मनाई केली असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल वापरु नये असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ६४ लाख मतदारांच्या मतदानासाठी २९ हजार कर्मचारी ६६२१ मतदान केंद्रांवर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 8:10 PM
मतदान प्राप्तीसाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांचे नियोजन करून मतदाराना मोठ्याप्रमाणात सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्स्फुर्तपणे मोठ्याप्रमाणात भरघोस मतदान करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे उपस्थित होते. जास्तित जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रि येत सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या महात्सवात सहभागी व्हावे असे आवाहन नार्वेकर यांनी मतदाराना केले आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात पुरु ष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आदी ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार आहेत. यामध्ये पुरु ष ३४ लाख ७९ हजार ५०८ तर २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदारांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे* ४० लाखांची दारू जप्त - दोन लाख ९८६ लिटर अवैध दारू जप्त केली आहे. त्याची किंमत ४० लाख रूपये आहेत. राज्यात सर्वाधिक दारू ठाणे जिल्ह्यातून जप्त ५८०२ शस्त्रास्त्रे जमा-* १२ हजार पोलीस कर्मचारी * वाहतुकीसाठी २९०४ वाहने -