शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

ठाणे जिल्ह्यावर अत्याचाराचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:17 AM

ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेता, शासनस्तरावर त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, पाणीटंचाईच्या परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी नाशिक-अहमदनगरसाठी ठाण्यात नवे धरण बांधणे हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जनतेवर अत्याचाराचा कहर आहे.आज राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या ४५.२३ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशात राहते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. येत्या काळात नैनासह परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर धसई येथे आणखी एक टाउनशिप विकसित करण्यात येत आहे. मात्र, हे करताना पिण्याचे पाणी आणणार कोठून, याचा विचार होताना दिसत नाही. नुसती शेतजमीन संपादित करून ती बिल्डरांच्या आणि विकास प्रकल्पांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याच्या स्रोतात तसूभरही वाढ झालेली नाही. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी धरणे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. पण, त्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही. त्यामुळे नाशिक-नगरसाठीच्या नव्या धरणांसाठी जमीन आणणार कोठून, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.मुंबईच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मुंबईची सध्याची पाण्याची मागणी ४७७० दशलक्ष लीटर एवढी आहे. भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, मोडकसागर, विहार या स्रोतांतून ३९८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून मुंबईला दररोज ७९० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. एवढीच मुंबईत पाणीगळती आहे. अख्ख्या पुणे शहराला पुरेल एवढे हे गळतीचे प्रमाण आहे. यातील तुळशी आणि विहार वगळता सर्वच धरणे ठाणे-पालघर जिल्ह्यांत आहेत. तेथील शेतकºयांच्या हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन त्याखाली गेलेली आहे.वसई-विरार प्रदेश आणि मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राची पाण्याची गरज ६३० दशलक्ष लीटर एवढी असून या भागात सूर्या, बारवी, उसगाव, पापडखिंड, पेल्हार या धरणांतून ३२२ द.ली. पाणीपुरवठा होतो. या भागात विहिरी आणि टँकरमधून १५ द.ली. पाणीपुरवठा होत असून सुमारे ३०८ द.ली. इतका प्रचंड तुटवडा आहे.भविष्यात मुंबई शहर ज्या भागात सरकत आहे, त्या कर्जत-खालापूर-खोपोली भागाची पाण्याची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लीटर असून या परिसराला उल्हास खोºयातून २४ दशलक्ष लीटर पाणीपुरठा होत असल्याने १२ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. कर्जत-खोपोलीच्या विकासामुळे अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भविष्यात विकसित होणाºया नगर वसाहतींमुळे पाण्याची मागणी वाढणार आहे.नवी मुंबई विमानतळामुळे ज्या पनवेल, खोपटानगराचा विकास होणार आहे, त्या परिसराची सध्याची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लीटर आहे. या परिसराला पाताळगंगासह स्थानिक स्रोतांतून १७ दशलक्ष लीटर पाणी मिळत असून २७ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. विमानतळ, सेझ, न्हावाशेवा-शिवडी सी लिंक, रेवस-आवरे बंदर यामुळे या परिसराचा येत्या काळात झपाट्याने विकास होणार आहे.शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांची पिण्याच्या पाण्याबाबत अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शहापूरसारखा तालुका अख्ख्या मुंबईची तहान भागवत असताना तेथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याच गावाला केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विभागाच्या मानकानुसार रोज दरडोई ७० लीटर पाण्याचा पुरवठा होत नाही. सुमारे ६० टक्के गावांना ४० ते ६९ लीटर, २४ टक्के गावांना ४० लीटरच्या खाली तर मुंबईच्या जलवाहिन्या गावांतून जातात. त्यांना अवघा २७ टक्के पाणीपुरवठा होत आहे.>ठाणे-पालघर जिल्ह्यांतील सध्याची धरणे आणि त्यांची मालकीअप्पर वैतरणा मुंबई मनपामध्य वैतरणा मुंबई मनपामोडकसागर मुंबई मनपातानसा मुंबई मनपाभातसा जलसंपदासूर्या मुंबई मनपाउसगाव वसई मनपापेल्हार वसई मनपापापखिंड वसई मनपाआंध्रा धरण टाटा कंपनीबारवी एमआयडीसीचिखलोली जीवन प्राधिकरणवराळा तलाव भिवंडी मनपा