शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साडेतीन हजार वृक्षांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:55 PM

मेट्रोसह बिल्डरहित : तासाभरात दिली मंजुुरी

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण शिथिल होण्याच्या आधीच केवळ अत्यावश्यक बाबीचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अवघ्या एका तासात तब्बल तीन हजार ५२७ वृक्षतोडीस बुधवारी मंजुरी दिली. यामध्ये ९५० वृक्ष हे मेट्रोसाठी बाधित होणार असले, तरी तब्बल दोन हजार वृक्ष हे विकासकांच्या प्रकल्पात बळी जाणार आहेत.

निवडणूक आचारसंहिता असल्याने समितीची बैठक बोलावणे प्रशासनाला अडचणीचे झाले होते. त्यामुळे समितीवरील नगरसेवक सदस्य वगळून आणि केवळ तज्ज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत ही मंजुरी देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. मात्र, त्याची कुणकुण सत्ताधाऱ्यांना लागल्यानंतर नगरसेवक आणि तज्ज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत वृक्षतोडीचे हे प्रस्ताव झटपट मंजूर केले. एखादा अपवाद वगळता कोणत्याही प्रस्तावावर कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा तज्ज्ञ सदस्यांनीही पर्यायी मार्ग सुचवला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीत ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीअंतर्गत बांधल्या जाणाºया रस्त्यांसाठी ४८ झाडे तोडणे आणि ३२३ झाडांच्या पुनर्रोपणाला परवानगी दिली आहे. कळव्यातल्या ऊर्जा प्रतीक ते नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्यासाठी ८४, तर शिवाईनगर ते रामबाग आणि सिद्धांचल सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३७ झाडे तोडली जाणार आहेत. रेमण्ड कंपनीच्या जागेवर रस्ता आणि मल्टिलेव्हल कार पार्किंग, क्लबहाउससाठी १४० झाडांचे पुनर्रोपण आणि ९१ झाडे तोडली जाणार आहेत.बिल्डरांना पायघड्या : कोलशेत येथील लोढा बिल्डर्सच्या प्रकल्पासाठी २२५ झाडांची कत्तल आणि १२९ झाडांचे पुनर्रोपण, कोलशेत-कावेसर येथील हिरानंदानी बिल्डर्सच्या प्रकल्पासाठी ११९ झाडांचे पुनर्रोपण आणि ३२ झाडे तोडणे, पिरॅमल इस्टेटच्या बाळकुम येथील प्रकल्पात अडसर ठरणारी ४७३ झाडे तोडणे आणि ५१३ झाडांचे पुनर्रोपण, चितळसर-मानपाडा सेक्टर क्र . ४ येथील १७७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ७६ झाडे तोडणे, ड्रीम होम्स कंपनीच्या शीळ येथील विकास प्रस्तावातील दोन झाडे तोडणे आणि ३३ झाडांचे पुनर्रोपण अशा बिल्डरधार्जिण्या प्रस्तावांना मंजुरी दिली.