ठाणे : दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या शुभांगी ऊर्फ मंजिरी (रा. पुणे) या महिलेसह तिघांना ठाण्याच्या वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजारांचे ३० कासवही हस्तगत करण्यात आले आहेत.घरातील फिशटँकमध्ये ठेवण्यात येणा-या मासळीची विक्री करणा-या ठाण्यातील एका दुकानातून या स्टार कासवांची विक्री होत असल्याची माहिती दिल्ली येथील ट्रॅफिक इंडिया या केंद्रीय वनविभागाच्या गुप्त वार्ता विभागाने ठाण्याच्या वनविभागाला दिली होती. याच माहितीच्या आधारे ठाण्याच्या रेल्वेस्थानक परिसरातून या कासवांच्या विक्रीसाठी आलेल्या मृगल नाडर (४४) याला अटक केली. ठाण्याच्या सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कर्नाटकातून हे कासव मागवले होते. नाडरसह त्याच्या साथीदारालाही या पथकाने अटक केली आहे. १४०० रुपये प्रतिकासव याप्रमाणे २८ हजारांमध्ये या २० कासवांचा ‘सौदा’ त्यांनी केला. हा सौदा सुरू असतानाच वनविभागाच्या अधिकाºयांनी नाडरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ही २० आणि अन्य चार अशी २४ कासवे वनविभागाने जप्त केली. याच दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोमवारी पुण्यातून शुभांगी ऊर्फ मंजिरी हिलाही या पथकाने ताब्यात घेतले. तिच्या घरातून आणखी सहा कासवे हस्तगत करण्यात आली आहेत...................नावे बदलून तस्करीस्टार कासवांची तस्करी करण्यात मुंबई, पुण्यात कुख्यात असलेली ही महिला स्वत:चे नाव बदलून हे ‘उद्योग’ करते. मुंबईत ती शुभांगी नावाने तर पुण्यात मंजिरी नावाने वावरते. पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात तीच या कासवांची तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाच्या चौकशीत समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यात सोमवारी अशाच एका प्रकरणात तिची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर, अवघ्या काही तासांतच ठाण्याच्या वनविभागाने तिला ताब्यात घेतले.
दुर्मीळ कासवांची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:47 PM
वेगवेगळी नावे बदलून मुंबई पुण्यासह राज्यभर दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करण-या शुभांगी उर्फ मंजिरी या महिलेसह तिघांना ठाणे आणि मुंबई वनविभागाने अटक केली आहे. तिला पुण्यातून तर तिच्या साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देदोघांना ठाण्यातून तर महिलेला पुण्यातून अटकठाणे वनविभागाची कारवाईस्टार जातीच्या ३० कासवांची सुटका