भिवंडी: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना नारपोली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. याप्रकरणी भिवंडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नारपोली ठाण्यात तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हि अटक करण्यात आली आहे. उमेश रमेश राठोड वय २३ वर्ष रा.वसई, पवनकुमार महावीर भार्गव वय ३५ रा.विरार, व स्वप्नील उत्तम पोवार वय २४ वर्ष,रा.वसई असे अटक आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी आपसात संगनमत करून ८५ लाख ४५ हजार २२० रुपये किंमतीचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा कोणतीही शासकीय परवानगी न घेता विनापरवाना जवळ बाळगुन विक्री करण्यासाठी जात असल्याची खबर पोलिसांना लागताच .नारपोली पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली गावा जवळ मिनी पंजाब हॉटेलसमोरून या तिघांना अटक केली आहे.या प्रकरणी भिवंडी वन परिक्षेत्र अधिकारी पुजा शंतनू रक्ताटे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.