शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून एक कोटी ३७ लाखांचे दागिने चोरणाऱ्या झारखंडच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 2:51 PM

ठाण्यातील शिवाईनगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एक कोटी ३७ लाख दोन हजारांचे सोने चांदीचे दागिने लुटणाºया सुलतान शेख (२९, रा. निमाईटोला, झारखंड), अब्दुल हक (३४, रा. उत्तर पियारपूर, झारखंड) आणि आलमगिर शेख (३३, रा. बोलटोला, झारखंड) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. याआधी नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांनी याच चोरीतील दोघांना अटक केली होती.

ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कारवाईमुंबई विमानतळावरुन घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील शिवाईनगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एक कोटी ३७ लाख दोन हजारांचे सोने चांदीचे दागिने लुटणाºया सुलतान शेख (२९, रा. निमाईटोला, झारखंड), अब्दुल हक (३४, रा. उत्तर पियारपूर, झारखंड) आणि आलमगिर शेख (३३, रा. बोलटोला, झारखंड) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. या तिघांनाही मुंबईतील आंतरराष्टÑीय विमानतळावरुन ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूलाच झारखंडच्या या टोळक्याने फळ विक्रीसाठी दुकानाचा गाळा भाडयाने घेऊन त्याच दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून या ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव केला होता. नंतर गॅस कटरच्या मदतीने दागिन्यांची तिजोरी फोडून १६ ते १७ जानेवारी २०२१ रोजी ही लूटमार करुन पलायन केले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. अत्यंत नियोजनबद्धपणे इतक्या मोठया प्रमाणात ही लूट झाल्याने गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता. पोलीस उपायुक्त डॉ. राठोड यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि कासारवडवली अशा सर्वच पोलीस ठाण्यांना तपासाचे आदेश दिले होते. त्याचअनुषंगाने कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु होता. याच चोरीतील संशयित सुलतान शेख याच्यासह तिघे आरोपी हे पटना येथील लोकनायक जयप्रकाश एअरपोर्ट येथून मुंबईतील आंतरराष्टÑीय विमानतळावर ३० मार्च रोजी येणार असल्याची गोपनीय माहिती खैरनार यांना मिळाली होती. त्याच आधारे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार सापळा लावून या पथकाने मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांच्या मदतीने या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांचा या ज्वेलर्सच्या चोरीमध्ये सक्रीय सहभाग असल्याची बाब चौकशीत समोर आली. विशेष म्हणजे ते पुणे परिसरातील आणखी एक ज्वेलर्सचे दुकान फोडून रात्रीची चोरी करण्यासाठीच ते आल्याचीही त्यांनी कबूली दिली.* पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खैरनार, रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे आणि सागर जाधव आदींच्या पथकाने हा यशस्वी तपास केला.* याआधी नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांनी याच चोरीतील दोघांना अटक केली होती. त्यांना वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता अटक केलेले तिघे या चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. राठोड यांनी दिली.                                                                                 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी