ठाणे: खासगी प्रवाशांची वाहतूक करणा-या बसच्या डिकीतून चक्क मगर या दुर्मिळ वन्य प्राण्याची तस्करी करणा-या बस चालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (३३) याच्यासह खुददुस लतीफ बैग (३८) आणि शिवाजी बलाया (२८) या तिघांना ठाणे वनविभागाने मुंबईतील बोरीवली भागातून सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन जिवंत मगरींची सुखरुपरित्या सुटका करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.बोरीवली येथे जाणाºया एका खासगी प्रवासी बसमधून मगरींच्या पिलांची तस्करी होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १६ सप्टेंबर रोजी बोरीवली येथे एका संशयित बसची ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी आणि मोरे आदींच्या पथकाने तपासणी केली. तेंव्हा बसच्या सामान ठेवण्याच्या डिकीत एका बॉक्स मध्ये डांबून ठेवलेल्या दोन जिवंत मगरी आढळून आल्या. याप्रकरणी बस चालक हाफिज याच्यासह तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगरीची तस्करी करीत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून दोन मगरीची सुटका करण्यात आली आहे. त्यांनी या मगरी कोणाकडून आणल्या त्याची ते कोणाला विक्री करणार होते, याची चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
दुर्मिळ वन्यजीव मगरीची तस्करी करणाऱ्या तिघांना बोरीवलीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 8:24 PM
प्रवाशांची वाहतूक करणा-या खासगी बसमधील सामानाच्या डिक्कीतून चक्क दोन मगरींची तस्करी करणा-या दोघांना ठाणे वनविभागाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन मगरींच्या पिलांचीही सुटका करण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रवाशांच्या बसमधून केली जात होती मगरीची तस्करीठाणे वनविभागाची कारवाई दोन मगरींची केली सुटका