लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणा-या बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शोधमोहीम घेऊन ठाण्यातील किंगकाँगनगरमध्ये गुरुवारी धडक दिल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी यातील परवेश शेख (१९) याच्यासह तीन जणांना शुक्रवारी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.किंगकाँगनगरमध्ये बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि ठाणे शहरप्रमुख रवींद्र मोरे यांनी कासारवडवली पोलिसांना दिली. त्यांनीच या भागातील काही संशयितांची १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चौकशी करून काही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते आणि पी.एन. उगले तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन या प्रकाराची खात्री केली. त्याठिकाणी लालबानू कबीर मोला (३०, मूळ रा. तासपूर, जिल्हा जोशूर, बांगलादेश), परवीन नूर इस्लाम शेख (४०, मूळ रा. सुरेशर, ढाका, बांगलादेश) आणि परवेश नूर इस्लाम शेख (१९, मूळ रा. सुरेशर, ढाका, बांगलादेश) हे तीन बांगलादेशी बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे आढळले. त्यांच्याविरु द्ध भारतीय पारपत्र अधिनियम १९२० चे अधिनियम कलम तीन अ आणि ६ -अ तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्डही जप्त केले आहे.* प्रेमविवाह करून भारतात आणलेया तीनपैकी एका महिलेला तिच्या पतीने प्रेमविवाह करून बांगलादेशातून भारतात आणले. तिला तो ठाण्यात ठेवून पुन्हा बांगलादेशात गेला आहे. तर, दुसरीचा पती हा भारतीय असल्याचे उघड झाले आहे. या भागात आणखी बांगलादेशी आहेत का? तशी पडताळणी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
अखेर ठाण्यातील किंगकाँगनगरमधील तीन बांगलादेशींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:27 PM
बेकायदेशीरपणे भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या परवेश शेख (१९) याच्यासह तीन बांग्लादेशी नागरिकांना शुक्रवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली. बांगलादेशी नागरिकांची महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शोधमोहीम घेऊन ठाण्यातील किंगकाँगनगरमध्ये गुरुवारी धडक दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
ठळक मुद्देमनसेने दिले होते पोलिसांच्या ताब्यातचार दिवसांची पोलीस कोठडीबेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य